रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:46 AM2018-08-23T00:46:10+5:302018-08-23T06:48:19+5:30

भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

More ST buses to leave for Rakshabandhan | रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस

रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस

Next

ठाणे : भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे विभागाने आपल्या ताफ्यातील शक्यतो सर्वच गाड्या रस्त्यांवर उतरवणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यांच्या ठिकाणीही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य परिवहनच्या ठाणे विभागात एकूण आठ डेपो असून ताफ्यात एकूण ६५० बस आहेत. त्या सर्व दररोज रस्त्यांवर धावतात असे नाही. परंतु, रक्षाबंधनच्या दिवशी महिलावर्ग जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यातच यंदा रक्षाबंधन हे रविवारी आल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानुसार २५, २६ आणि २८ या दिवसांत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी डेपोंवर होणारी अन्य वेळेच्या गर्दीनुसार त्या मार्गांवर तातडीने बस सोडल्या जाणार आहेत.

सर्वच मार्गांवर जास्त बसेस सोडण्याचा प्रयत्न
रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक ठिकाणी शक्य तेवढ्या जादा बस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त गर्दी झाल्यास त्याठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्यांनी या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागीय नियंत्रक शैैलेश चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: More ST buses to leave for Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.