जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 3, 2024 05:02 PM2024-03-03T17:02:46+5:302024-03-03T17:04:42+5:30

अरुणा लागू रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

more than 600 bicycle enthusiasts participated in the cycle ride organized on the occasion of international women day | जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण - डोंबिवली यांठिकाणाहून आलेल्या तब्बल ६०० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. रणरागिणी जीवन गौरव पुरस्कार ६७ वर्षीय अरुणा लागू यांना देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, ट्रॉफी, साडी, तुळशीचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरुप होते. 

वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन दी स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्याविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी हा अनोखा सोहळा रंगला होता. यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिके विजेत्यांनी जिंकली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली आठवले आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. आठवले म्हणाल्या की, अनेक जण ाआहाराचे ज्ञान घेण्यासाठी युट्युबच्या मागे धावतात मात्र, आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार हा ठरवायचा असतो. यावेळी सोलारीस हॉस्पीटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी गर्भमुखाचा कॅन्सर तर सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. कल्पना पाटील यांनी आयुर्वेदाची माहिती दिली. व्यासपीठावर डॉ. बेडेकर विद्या मंदिरचे माजी शिक्षक दीपक धोेडे, ओझोन बायसिकल कंपनीचे संचालक शैलेश घोलप, ह्युमेबलचे संचालक डॉ. अक्षय झोडगे, उद्यम फाऊंडेशनचे अतुल पिंगळे, मेयर व्हायटाबायोटीक्सचे ब्रंँड मॅनेजर रोहीत गिरासे आदी उपस्थित होते. ५ किमी अंतराची राईड संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक धोंडे तर १० किमी अंतर राईड पुरी आणि संस्थेची सदस्या धनश्री गवळी आदींच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी केले. 

उत्क्ृष्ट स्वयंसेवक म्हणून हर्षल सरोदे यांना त्याचप्रमाणे सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धनश्री गवळी, शुभांगी भोर, मंगला पै (६६ वर्षे) या महिलांचा तर सई पाटील, स्वरा आंब्रे, सान्वी पाटील या तीन मुलींंना रणरागिणी तसेच, वर्षभर सायकल चालविणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांना रणरागिणी विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

विजेते खालीलप्रमाणे

मुलींचा गट
सायकल सजावट स्पर्धा
प्रथम : स्वरांजली सुर्वे, द्वीतीय युगा बच्चम, तृतीय : गौरी राजे

वेशभूषा स्पर्धा 
प्रथम : ग्रिहीता विचारे, द्वितीय धन्वी कदम

स्लोगन स्पर्धा
प्रथम भक्ती बेलोशे, द्वितीय आहारा बिरारी, तृतीय : धन्वी कदम

महिला गट
प्रथम सुवर्णा अडसुळे, द्वितीय मयुरा पडाळे, तृतीय : लक्ष्मी सुर्वे

वेशभूषा स्पर्धा
प्रथम : संगीता पाटील, द्वितीय : अनिता जगताप, तृतीय : मैनावती रेवणकर
उत्तेजनार्थ : धनश्री कदम

स्लोगन स्पर्धा 
प्रथम : भारती बाचम, द्वितीय पद्मजा वेदांते, तृतीय : नम्रता पांचाळ, उत्तेजनार्थ : तेजस्वीनी शेलारे

मुले 
सायकल सजावट स्पर्धा
प्रथम : आराध्य सावंत, द्वितीय : पार्थ भालेराव

स्लोगन स्पर्धा
प्रथम : आरुष पांचाळ, द्वितीय पार्थ भालेराव, तृतीय : आशिष कोळी

पुरुष गट
सायकल सजावट स्पर्धा
डॉ. मनोज यादव,आशिष मगम

ज्येष्ठ नागरिक 
सायकल सजावट स्पर्धा : विजय पटवर्धन, स्लोगन आणि वेशभूषा स्पर्धा : वसंत घोडके

Web Title: more than 600 bicycle enthusiasts participated in the cycle ride organized on the occasion of international women day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.