जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; यंत्रणांनी सज्ज राहावे -  पालकमंत्री 

By सुरेश लोखंडे | Published: June 10, 2024 07:34 PM2024-06-10T19:34:18+5:302024-06-10T19:35:07+5:30

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. 

More than average rainfall in thane district this year Systems should be ready | जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; यंत्रणांनी सज्ज राहावे -  पालकमंत्री 

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; यंत्रणांनी सज्ज राहावे -  पालकमंत्री 

ठाणे : पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ सहभागी झाले होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली या महापालिकांचे आयुक्त, अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, कृषी, जलसंपदा आदी  उपस्थित होते.  

जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन  देसाई म्हणाले की, पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात नाले तुंबणे, पाणी साचणे असे प्रकार होतात. अशा ठिकाणी महानगरपालिका, नगर पालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी. महापालिका, नगरपरिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे. परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेकवेळेस गटारीमध्ये घाण साचून नाले तुंबतात. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे.  धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम पडल्यास. ही तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजेची सुविधा असावी,  अशा सूचनाही मंत्री. देसाई यांनी दिल्या. नागरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क असावे. साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: More than average rainfall in thane district this year Systems should be ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.