वृक्षवल्ली प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरीकांची भेट!
By अजित मांडके | Published: February 12, 2024 04:14 PM2024-02-12T16:14:57+5:302024-02-12T16:15:19+5:30
अनेकांनी विविध रंगाची फुल झाडे, शोभिवंत वृक्षांची खरेदी करत या प्रदर्शनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
ठाणे : विविध रंगाची फुले, झाडे, वृक्ष, शोभीवंत वृक्ष, औषधी झाडे, भाजीपाला आदींसह जांभळ्या रंगाच्या गुलाबाने आणि ट्युलिप या फुलांनी जास्तच भाव खाऊन गेला. निमित्त होते, ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने आयोजित केलेल्या वृक्षवल्ली २०२४ या १३ व्या वृक्ष प्रदर्शनाचे. ९ ते ११ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात तब्बल दिड लाखाहून अधिक नागरीकांनी भेट दिल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच अनेकांनी विविध रंगाची फुल झाडे, शोभिवंत वृक्षांची खरेदी करत या प्रदर्शनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
फुले, फळे, भाज्या, झाडे किवा रापे यांचे प्रदर्शन (वषांतून किमान एकदा) आयोजित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत वृक्षवल्ली २०२४ या १३ व भव्य झाडे, फुले, फळ, भाजीपाला यांचे प्रदर्शन रेमंड रेस ट्रैक, जे.के ग्राम, पोखरण रोड नं.१, ठाणे, प. येथ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात पहिल्या दिवसापासून याठिकाणी नागरीकांचा ओढा दिसून आला. तसेच काही शाळांनी देखील या प्रदर्शनाला आवर्जुन भेट दिल्याचे दिसून आले. त्यातही, या प्रदर्शनात फुलांची, शोभिवंत वृक्षांची तसेच इतर वृक्षांची एवढा आर्कषक पद्धतीने मांडणी केली होती. त्यातूनही अनेकांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या प्रदर्शनामध्ये कुंड्यामधील शोभिवंत पानाची झाडे (झुडपे), कुंडयातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (आॅर्कीडस) कुंडीतील वृक्ष, हंगामी फूल, दांडीसह (केट फ्लॉवर) इतर असे एकूण २२ विभाग व पोटविभाग आहेत त्यांची मांडणी याठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
त्याचबरोबर शहरातील उदयाने व वागांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये ज्यामध्ये लहान मोठ्या अशा एकूण २५० स्पर्धकांनी भाग घतला आहे. तसेच प्रदर्शनामध्ये बागांची सर्वोच्च वस्तु, उत्पादन, बांबूपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तु इत्यादीचे जवळ जवळ ४० पेक्षा जास्त स्टॉल्स उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा प्रत्येक स्टॉलला अगदी खिळून होत्या. हे फुल झाड घ्यावे की ते अशी काहींची पंचाईत झाली होती. त्यातही लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा गुलाब तर दिसत होतेच, शिवाय जांभळ्या गुलाबाने यात अधिकचा भाव खावून गेला. तर जुन्या ंिहंदी चित्रपटात दिसणार ट्युलिपची फुलांनी देखील या प्रदर्शनात आपली वेगळी छाप सोडल्याचे दिसून आले.
प्रदर्शनामध्य लायन्स क्लव, रोटरी क्लब, मध्यरल्व, माहिम नचर पार्क, एम सी.एच आयु, लोढा ग्रुप, हिरानंदानी ग्रुप व इतर तसंच प्रत्येक नागरिकांनी असे एकूण ७० ते ८० संस्था च नागरिक यांनी या प्रदर्शनात भाग घेऊन विविध आशयांचे पर्यावरण पुरक देखावे देखील तयार केले होते. त्यानुसार अवघ्या तीन दिवसात तब्बल दिड लाखाहून अधिक ठाणेकरांनी या नुसतीच भेट दिली नाही तर येथील फुलझाडे, औषधी झाडे, फुलझाडे विकत सुद्धा घेतली.