मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 02:48 AM2018-11-04T02:48:54+5:302018-11-04T02:49:09+5:30
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद अखेर ठाणे महापालिकेने रद्द केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ठाणे - मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद अखेर ठाणे महापालिकेने रद्द केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंब्य्रातील प्रभाग क्रमांक ३१ ड चे नगरसेवक असलेले किणे यांच्याविरोधात एका दक्ष नागरिकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, न्यायालयाने निकाल देताना याची तपासणी करून पुढील कारवाई करण्यास ठाणे महापालिकेने सांगितले होते. त्यानुसार, या प्रकरणात तपासणी केली असता मुंब्य्रातील दोन इमारतींमध्ये ते स्वत: विकासक असल्याचे आढळले असून त्या अनधिकृत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, त्यांचे नगरसेवकपद रद्द केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात किणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.