ठाणे स्थानक परिसरातील पार्किंगला उद्याचा मुहूर्त
By admin | Published: June 14, 2017 03:02 AM2017-06-14T03:02:35+5:302017-06-14T03:02:35+5:30
ठाणे रेल्वे स्थानकात उभारताना अर्धवट राहिलेल्या वाहन पार्र्किंग इमारतीच्या तळ मजल्यावर वाहन पार्र्किंगसाठी अखेर मुहूर्त सापडला. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात उभारताना अर्धवट राहिलेल्या वाहन पार्र्किंग इमारतीच्या तळ मजल्यावर वाहन पार्र्किंगसाठी अखेर मुहूर्त सापडला. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन येत्या गुरूवारी वाहन पार्र्किं गची सुविधा सुरू होत आहे. सायकल, मोटारसायकल आणि कार पार्क करता येणार असून त्यासाठी कमीत-कमी दोन तासांपासून १२ तासांपुढील वाहन पार्र्किं गचे दरही निश्चित केले आहे. तसेच महिन्याच्या पासचीही व्यवस्था केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऐतिहासिक ख्याती असलेले ठाणे हे आशियातील पहिले रेल्वे स्थानक आहे. स्थानकाच्या आवारात वाहने पार्क करण्यासाठी बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. ही इमारत उभ्यासाठी तेथे असलेले रेल्वेचे लोहमार्ग पोलीस ठाणेही दुसऱ्या जागी हलवले आहे. या इमारतीचा तळ अधिक एक मजला उभा राहिला आहे. मात्र, निधी अभावी ठाणे रेल्वे स्थानक येथील बहुमजली पार्र्किंगचे काम कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. याचदरम्यान, ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी, या रखडलेल्या कामाबाबत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. त्यावेळी हे काम लवकरच सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, ते काम अद्यापही पुर्णत्वास सोडाच, तेथे एकही वाट उभारलेली नाही. त्यातच ठाण्याहून लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करीत असल्याने त्यांची पार्र्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे, कोपरी पूर्व कडील पार्र्किंगच्या कोटेशन्स पद्धतीने या बहुमजली इमारतीच्या तळ मजल्यावर पार्र्किं गची व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पद्धतीने तीन महिन्यावर कोटेशन्स पद्धती पार्किंगचा ठेका श्री साई मार्के टींगला दिल्याचे माहिती सूत्रांनी सांगितले.
हेल्मेट ठेवण्यासाठीही सोय
सायकल पार्किंगसाठी पहिल्या दोन तासांसाठी ५ रु. मोजावे लागणार आहे. तर मोटारसायकलसाठी १० आणि कारला २० रुपये द्यावे लागणार आहे. तर पुढील ४ तासांना दर दुप्पट के ले आहेत. तसेच महिन्याच्या पाससाठी सायकलला २००, मोटारसायकलसाठी ४०० आणि कारसाठी ९०० रुपये मोजवावे लागणार आहे.
मोटारसायकल उभी केल्यावर चालकाचे हेल्मेट ठेवण्यासाठीही विशेष सोय केली आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांसाठी २ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच वाहनधारकांना येते-जाते वेळी पावती आणणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.