राज्यात सर्वाधिक शौचालये ठाण्यात

By admin | Published: July 11, 2015 03:31 AM2015-07-11T03:31:57+5:302015-07-11T03:31:57+5:30

स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ग्रामीण भागात शौचालये बांधून गावपाडे हगणदारीमुक्त करण्याची योजना राज्य शासन जिल्हा परिषदांच्या माध्यमातून राबवत आहे

Most toilets in the state are in Thane | राज्यात सर्वाधिक शौचालये ठाण्यात

राज्यात सर्वाधिक शौचालये ठाण्यात

Next

सुरेश लोखंडे , ठाणे
‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ग्रामीण भागात शौचालये बांधून गावपाडे हगणदारीमुक्त करण्याची योजना राज्य शासन जिल्हा परिषदांच्या माध्यमातून राबवत आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही ठाणे जिल्हा परिषदेने राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्या तुलनेत सर्वाधिक २१ हजार ७३४ शौचालये बांधली आहेत. राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हा परिषदेचे राज्याचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठकीत कौतुक केले.
या मिशनच्या माध्यमातून गावपाडे, खेडे येथे स्वच्छताविषयक जनजागृती करून जास्तीतजास्त वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. पण, त्यासाठी निधीची फारशी तरतूद नसल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांना शौचालये बांधणे फारसे शक्य झाले नाही.

Web Title: Most toilets in the state are in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.