धसईत कोरोनामुळे आई, मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:51+5:302021-03-20T04:40:51+5:30

मुरबाड : गेेली दोन महिने तालुक्यात कमी झालेला कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. धसईत एकाच दिवशी आई, मुलाचा मृत्यू ...

Mother, child die due to collapsed corona | धसईत कोरोनामुळे आई, मुलाचा मृत्यू

धसईत कोरोनामुळे आई, मुलाचा मृत्यू

Next

मुरबाड : गेेली दोन महिने तालुक्यात कमी झालेला कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. धसईत एकाच दिवशी आई, मुलाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढला, असे आरोग्य विभागाचे मत आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही येथील कोविड सेंटर बंद केले होते. चार दिवसांपूर्वी पाच रुग्ण सापडल्याने त्यांच्यावर बदलापूर, कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते; परंतु गेल्या दोन दिवसांत रुग्णांची संख्या ३२ वर गेल्याने बंद केलेले कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी दिली.

कोरोनाचा विसर पडून नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्नसमारंभात गर्दी करणे, यामुळे गेल्या चार दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला मुलगा व होम क्वारंटाइन असलेल्या आईचा कोरानाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तर शुक्रवारी सात रुग्ण आढळले.

नव्याने सापडणारे रुग्ण बदलापूर व कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये जाण्यास तयार होत नसल्याने तिघांना बदलापूरला पाठवले असून, २२ जण होम क्वारंटाइन असून, उपचार घेत आहेत. वाढते रुग्ण पाहता दोन महिन्यांपूर्वी बंद केलेले कोविड सेंटर दोन दिवसांत पुन्हा सुरू करण्यात येत असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केल्यास प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येऊ शकेल, असे बनसोडे यांनी सांगितले.

Web Title: Mother, child die due to collapsed corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.