मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या 

By धीरज परब | Published: September 17, 2022 10:37 PM2022-09-17T22:37:36+5:302022-09-17T22:39:02+5:30

मीरारोड मध्ये २८ वर्षीय आईने तिच्या ६ वर्षीय मुलीसह ६ मजली इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. 

mother committed suicide by jumping from the terrace with her 6 year old daughter in mira road | मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या 

मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  मीरारोड मध्ये २८ वर्षीय आईने तिच्या ६ वर्षीय मुलीसह ६ मजली इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे . 

मीरारोडच्या नित्यानंद नगर भागात गौरव गॅलेक्सी फेज १ हि ६ मजली इमारत आहे .  त्या इमारतीत सुरेश हरिरामजी देवासी ( ३१ ) हे पत्नी रेखा ( २८ ) सह ६ वर्षाची अंकिता आणि ३ वर्षाची पूजा ह्या मुलींसह राहतात . सुरेश यांचे परिसरातच  स्टेशनरीचे दुकान आहे . 

शनिवार १७ सप्टेंबर रोजी सुरेश हे नेहमी प्रमाणे दुकानात गेले होते . दुपारी अडीज च्या दरम्यान  रेखा यांनी मुलगी अंकिता हिच्या सह इमारतीच्या गच्ची वरून खाली उडी मारली . इमारतीच्या रखवालदाराच्या सदर प्रकार लक्षात आल्या नंतर त्याने सुरेश यांना घडला प्रकार सांगितलं . त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता माय - लेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या . सुरेश यांनी रहिवाश्यांच्या मदतीने दोघींना नजीकच्या रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . 

रेखा यांनी अंकिता हिला लिफ्टने ६ व्या मजल्यावर नेले व तेथून त्या गच्चीवर गेल्या . ३ वर्षाच्या दुसऱ्या मुलीला मात्र त्यांनी घरीच ठेवले होते  म्हणून ती वाचली .  ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे . काशीमीरा पोलिसांनी घटनास्थळी व घरात पाहणी केली असून या प्रकरणी संबंधितांचे जबाब व तपास सुरु आहे असे सांगण्यात आले . 

आत्महत्येचे नेमके कारण असून स्पष्ट झालेले नाही . रेखा हि काही काळा पासून मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पती कडून सांगण्यात आले असले तरी या प्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले .  
 

Web Title: mother committed suicide by jumping from the terrace with her 6 year old daughter in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.