अनैतिक संबंधांना पतीचा विरोध, पत्नीने केली स्वतःच्याच मुलीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:21 PM2018-09-27T14:21:47+5:302018-09-27T14:22:29+5:30
अनैतिक संबंधाला पतीने विरोध केल्याने पत्नीने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
कल्याण : अनैतिक संबंधाला पतीने विरोध केल्याने पत्नीने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या निर्दयी आईनं चिमुकलीची हत्या करुन मृतदेह गवतात फेकला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पूजा प्रसादविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.
मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असणारे ननकण प्रसाद व पूजा प्रसाद हे दाम्पत्य डोंबिवली पूर्वेकडील भोपर येथील विठाबाई चाळीत राहत होते .त्यांना एक वर्षाची मुलगी होती. पूजा हिचे अनैतिक सबंध असल्याची कुणकुण ननकण याला लागली होती. त्यातून या दोघामध्ये अनेकदा वाद होत असत ननकण याने अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पूजा संतापली होती. काल ही पती-पत्नी मध्ये वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात पूजाने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिच्या पोटच्या १ वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. हे कुकृत्यबाबत कोणाला माहिती मिळू नये, म्हणून तिनं चिमुकलीचा मृतदेह गवतात फेकून दिला.
हा प्रकार ननकण यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.