पोटच्या मुलीचा केला आईने लाखात सौदा, नुकताच झाला होता वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:03 AM2017-12-19T02:03:52+5:302017-12-19T02:04:04+5:30
पोटच्या तेरावर्षीय मुलीच्या कौमार्याचा लाखात सौदा करून तिला शरीरविक्रयात ढकलण्याच्या तयारीत असलेल्या मातेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रविवारी पहाटे अटक केली. तिला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : पोटच्या तेरावर्षीय मुलीच्या कौमार्याचा लाखात सौदा करून तिला शरीरविक्रयात ढकलण्याच्या तयारीत असलेल्या मातेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रविवारी पहाटे अटक केली. तिला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
बारमध्ये वेटरेसचे काम करणारी ही महिला आपल्या अल्पवयीन मुलीसाठी गिºहाइकाच्या शोधात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली. त्या आधारे १६ डिसेंबरला सायंकाळी कोरम मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर या यशोधननगर पाडा क्रमांक-२ येथील ३२ वर्षीय महिलेला दौंडकर यांच्या पथकाने ताब्यात घेऊन तिच्याकडून या मुलीचीही सुटका केली. बारमध्येच कामाला असल्यामुळे याच व्यवसायामध्ये आपल्याला चांगली कमाई होईल, या लालचेपोटी तिने आपल्याच मुलीच्या कौमार्याचा एका बड्या असामीला सौदा करण्याचे ठरवले होते. त्यासाठीच ती काही गिºहाइकांशी बोलली. ४० पासून ५० हजारांपर्यंत काही गिºहाइकांकडून तिला संमती मिळाली. पण, सौदा पक्का होत नव्हता. ती मात्र, एक लाखांमध्येच ‘सौदा’ करण्याच्या निश्चयावर ठाम होती. हीच खबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. तिच्याकडे एक लाख रुपयांची रोकड घेऊन एक बनावट गिºहाईक पोलिसांनी पाठवले. चांगली असामी मिळाल्याचा तिचा समज झाल्याने तिने तयारी दर्शवली आणि ती पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकली. घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे पैशांची अडचण होती. त्यामुळे आपण हा प्रकार केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.
नुकताच झाला वाढदिवस-
ज्या मुलीच्या कौमार्याचा ‘सौदा’ तिच्याच आईने एक लाखांमध्ये केला, ती मुलगी सध्या सातवीमध्ये शिक्षण घेत असून तिचा १३ डिसेंबर रोजी वाढदिवसही साजरा करण्यात आला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वीही अशा
दोन मातांना अटक
यापूर्वी २६ जुलै २०१६ रोजी राबोडीतील ‘स्वागत लॉज’ परिसरात आपल्याच चौदावर्षीय मुलीचा शरीरविक्रयासाठी सौदा करणाºया मातेला अटक झाली होती. त्यानंतर, १८ आॅगस्ट २०१६ रोजी वागळे इस्टेट भागातील ‘पप्पू का ढाबा’ येथेही स्वत:च्याच सोळावर्षीय मुलीचा अशाच प्रकारे ‘सौदा’ करणाºया महिलेलाही रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने अटक केली होती.