आईचा मृतदेह नदीपात्रात, मुलगी, नातू अद्यापही बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:37+5:302021-09-14T04:47:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : उल्हास नदी पात्रात मोहने येथील विमल भगत (५८) यांचा मृतदेह बुधवार, ८ सष्टेंबरला आढळून ...

Mother's body in river basin, daughter, grandson still missing | आईचा मृतदेह नदीपात्रात, मुलगी, नातू अद्यापही बेपत्ता

आईचा मृतदेह नदीपात्रात, मुलगी, नातू अद्यापही बेपत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : उल्हास नदी पात्रात मोहने येथील विमल भगत (५८) यांचा मृतदेह बुधवार, ८ सष्टेंबरला आढळून आला; मात्र त्यानंतर त्यांच्या समवेत राहणारी मुलगी व नातू बेपत्ता झाले आहेत. नातेवाइकांकडे त्यांचा शोध घेऊनही ते सापडलेले नाहीत. यामुळे खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आहे.

विमल यांच्याबरोबर त्यांची मुलगी अनुराधा राहुल देवकर (३३) व नातू शौर्य (८) हे एकत्रित मोहने येथे राहत होते. ८ सप्टेंबरला विमल यांचा मृतदेह उल्हास नदीच्या पात्रात सकाळी आढळून आला. खडकपाडा पोलिसांनी तो ताब्यात घेतला. पोलिसांनी भगत यांच्या घरी मुलीचा व नातवाचा शोध घेतला असता ते बेपत्ता असल्याची बाब निदर्शनास आली आहे. मुलीचे काका दत्ता भगत यांनी याबाबत खडकपाडा पोलिसात पुतणी व नातू हरवल्याची खबर दिली आहे.

एकीकडे विमल यांच्या निधनामुळे नातेवाईक शोकाकुल असतानाच मुलगी आणि नातू घटना घडलेल्या दिवसापासून अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाइकांसह पोलीसही चक्रावले आहेत.

सिम कार्ड बदलल्याने खडकपाडा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक आळंदे म्हणाले की, घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे अनुराधा ही आपल्यासोबत घेऊन गेली आहे. मे महिन्यापर्यंतचे मोबाइल लोकेशन मिळाले आहेत; परंतु मोबाइलमध्ये दुसरे सिम कार्ड टाकल्याने निश्चित लोकेशन मिळण्यास थोडीशी अडचण निर्माण होत आहे. दोन दिवसांत अहवाल आल्यानंतर तिचे लोकेशन मिळणार आहे. अनुराधा आपल्या मुलासह मात्र सुरक्षित ठिकाणी असल्याचा आशावाद पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

--------------

Web Title: Mother's body in river basin, daughter, grandson still missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.