देहदानासाठी एका आईची चळवळ

By admin | Published: March 27, 2017 05:50 AM2017-03-27T05:50:18+5:302017-03-27T05:50:18+5:30

आपल्या मुलाचे देहदान करणाऱ्या आईने अवयवदानाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. एक महिन्यापूर्वी

A mother's movement for the body | देहदानासाठी एका आईची चळवळ

देहदानासाठी एका आईची चळवळ

Next

बदलापूर : आपल्या मुलाचे देहदान करणाऱ्या आईने अवयवदानाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. एक महिन्यापूर्वी पुण्यात दुचाकीच्या अपघातात ब्रेनडेड झालेल्या आपल्या मुलाचे नेहा बोबडे यांनी देहदान करून ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ हा मूलमंत्र घेऊन अवयवदानाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी बदलापूरमध्ये त्यांनी अवयवदानाविषयी जनजागृतीपर कार्यक्र म केला.
पुण्यात शिकणाऱ्या निशांत बोबडे या तरु णाचा २१ फेब्रुवारीला अपघात झाला. निशांतने हेल्मेट घातलेले होते, मात्र हेल्मेटचा बेल्ट सैल असल्याने अपघातात त्याचे हेल्मेट डोक्यातून फेकले गेले. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव गाडीच्या धडकेत निशांतच्या डोक्याला जबर मार लागला. निशांतवर उपचार सुरू असताना त्याचे ब्रेनडेड झाले. त्यामुळे निशांत बरा होऊ शकला नाही.
आपल्या पोटच्या मुलाची अपघातात झालेली ही अवस्था पाहता निशांतच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्यांनी स्वत:ला सावरत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. तिथेच न थांबता त्यांनी समाजात जागृती करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. यासाठी त्या संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. निशांत आयटीमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. (प्रतिनिधी)

संस्थांना आवाहन
शनिवारी बदलापूरमध्ये अवयवदानासंबंधी जनजागृतीचा कार्यक्र म करण्यासाठी आल्या होत्या. आमच्या परिवारातील सगळ्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला असून अवयवदान केल्याने दुसऱ्या कुणाला जीवन मिळेल, असे आवाहन करीत बोबडे यांनी सर्व सामाजिक संस्थांनी यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.

Web Title: A mother's movement for the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.