मुलीच्या मुक्तीसाठी मातेचे आंदोलन

By admin | Published: December 22, 2015 12:10 AM2015-12-22T00:10:01+5:302015-12-22T00:10:01+5:30

एका तरुणाने पळवून नेलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी तिच्या आईने आज पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले.

Mother's movement for the release of daughter | मुलीच्या मुक्तीसाठी मातेचे आंदोलन

मुलीच्या मुक्तीसाठी मातेचे आंदोलन

Next

वसई : एका तरुणाने पळवून नेलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी तिच्या आईने आज पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले.
आपल्या १६ वर्षीय मुलीला सद्दाम अन्सारी नावाच्या इसमाने पळवून नेल्याची तक्रार वसई कोळीवाड्यात राहणाऱ्या फरजाना शेख या महिलेने वसई पोलीस ठाण्यात केली होती. २१ नोव्हेंबरला मुलीला पळवून नेल्यानंतर आज एका महिन्यानंतरही तिचा तपास पोलिसांनी लावला नाही. तक्रार करताना मुलगी अन्सारी बरोबर गोरखपुरला गेली असल्याचे फरजानाने पोलिसांना सांगितले होते. त्यावरून वसई पोलिसांनी सद्दामशी संपर्क साधून आम्ही मुलीला न्यायला येत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर पोलीसांनी चालढकल केली. तब्बल पंधरा दिवसांनी पोलीस गोरखपुरला गेले. तेथून ते आठ दिवसांनी रिकाम्या हाताने परत आले. आम्ही येत असल्याचे समजल्यामुळे सद्दाम मुलीला घेवून गोरखपुरहून पळून गेल्याचे पोलिसांनी फरजानाला सांगितले.
पोलिसांनी सद्दामला सावध केले आणि त्याला अन्यत्र पळून जाण्साची संधी दिली.त्यामुळे आपली अल्पवयीन मुलगी हाती लागली नसल्याचा आरोप करत फरजानाने आज सकाळपासून वसई पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह धरणे धरले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Mother's movement for the release of daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.