मोटारसायकलसाठी महिलेला फसवले, लग्नाचे आमिष दाखवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:41 AM2018-01-15T00:41:43+5:302018-01-15T00:41:46+5:30
घरकाम करणा-या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणा-या अहमदनगरच्या एका युवकास नौपाडा पोलिसांनी अटक केली. मोटारसायकलची हौस भागवण्यासाठी त्याने महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
ठाणे : घरकाम करणा-या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणा-या अहमदनगरच्या एका युवकास नौपाडा पोलिसांनी अटक केली. मोटारसायकलची हौस भागवण्यासाठी त्याने महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
ठाण्यातील खोपट येथील भाजीवाला चाळीत राहणारी ३२ वर्षीय महिला लोकांकडे घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिला दोन मुले असून तिचा पती मुरबाड येथे वेगळा राहतो. ती मखमली तलावाजवळ राहणाºया एका कुटुंबाकडे घरकामाला जायची. याच भागातील एका सोसायटीतील इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. आरोपी मनोज वाघमारे ऊर्फ मनोहर किसन वाघमारे हा टिटवाळ्यातील हरिओम व्हॅलीमध्ये राहतो. मखमली तलावाजवळील इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामावर तो पर्यवेक्षक म्हणून काम करतो.
एकाच भागात काम करताना आरोपी मनोज आणि पीडित महिलेची नोव्हेंबर २०१७ मध्ये ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्न करून आपण सुखात जीवन जगू, असे स्वप्न आरोपीने पीडित महिलेला दाखवले. दोघांच्या भावी आयुष्यासाठी लहानसे घर विकत घेऊ, असेही आरोपीने तिला सांगितले. त्यासाठी काही पैसे मी देतो, काही तू जमव, असे आरोपीने तिला सांगितले. आरोपीच्या भूलथापांना बळी पडून पीडित महिलेने २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१७ या काळात थोडेथोडे करून आरोपीला एक लाख २० हजार रुपये दिले.