वाहनचालकांनो सावधान... कसारा घाटा तील रस्ता खचतोय, महामार्गाला गेला तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:15 PM2022-07-16T19:15:06+5:302022-07-16T19:18:15+5:30

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे.

Motorists beware... the road in Kasara Ghat is crumbling, the highway is cracked | वाहनचालकांनो सावधान... कसारा घाटा तील रस्ता खचतोय, महामार्गाला गेला तडा

वाहनचालकांनो सावधान... कसारा घाटा तील रस्ता खचतोय, महामार्गाला गेला तडा

googlenewsNext

शाम धुमाळ

कसारा - मुबई नाशिकमहामार्गांवरील कसारा घाटासह पडघा ते गोंदे दरम्यान महामार्गावर मोठ मोठ्या खड्ड्यांना चुकवत प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. त्यातच आता कसारा घाटातील रस्ताच खचत चालला असून महामार्गांवर काही अंतरावरील रस्त्याला पूर्णत: तडे गेल्याने रस्ता दबला गेला आहे. रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कठडेदेखील रस्ता सोडून बाजूला सरकल गेले आहेत. 

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसारा घाटात  2020 च्या पावसाळ्यात कसारा जुना घाट व नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता परिणामी काही दिवस महामार्गावरिल् वाहतूक एकेरी सुरु ठेवण्यात आली होती.

पावसाळा झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कंपनी व एका ठेकेदाराकरवी करोड रुपये खर्च करुन दोन्ही रस्त्याचे भरावं करुन तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली. परंतु, याही वर्षी करणार जुन्या कसारा घाटात रस्त्याला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते त्याच ठिकाणी रास्त्याला मोठे तडे गेले असून 500 मिटर च्या अंतरावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडा गेला आहे .शिवाय रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या सुरक्षितते साठी जाळी बांध पद्धतीचे व सिमेंट आर.सी.सी.चे वरच्यावर संरक्षण कथडे संबंधित ठेकेदार कंपनी ने बांधले होते ते सुद्धा 1 ते दीड फुट खाली दबले गेले आहेत तर काही कथडे रस्त्याचा एकसंध पणा सोडून बाजूला पडले आहेत. दरम्यान, जुन्या कसारा घाटातील रस्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहणांमुळे रस्त्याला मोठी हानी पोहचून्यची शक्यता नाकारता येत नाही. कोसळणारा पाऊस व वाहनांच्या कम्पिंगमुळे महामार्गांवरील रस्ता जास्त प्रमाणात खचण्याची शक्यता असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तडा गेलेल्या व खचलेल्या रस्त्यावर  उपाययोजना करुन 1 किमी रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरु ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तडा गेलेल्या रस्त्यात पाणी जाऊन भरावं खाचण्याची शक्यता

दरम्यान जुन्या कसारा घाटात रहदारी मोठ्या प्रमाणात असते त्यातच 500 मिटर चा रस्ता खचला आहे अनेक मोठ्या भेगा या रस्त्यावर पडल्यात दरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा,तडे यात पाणी जाऊन भरावं खाचण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात आहे. तुटलेले संरक्षक कथडे.,रस्त्यावरील खड्डे प्रवाशाच्या जीवावर. दरम्यान मुबई नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे रस्त्याची चाळन झाली आहे खड्ड्यामुळे अनेक आपघात  झालेत तर कसारा घाटात खड्ड्या ची रांगोळी आहेच पण कसारा घाटाच्या नागमोडी वळणावर व खोल दरीत जाण्या पासून संरक्षण व्हावे यासाठी असलेले संरक्षण कथडे पूर्णतः तुटून गेलेले आहेत त्यामुळे मुबई नाशिक हा  टोल रस्ता प्रवशांच्या जीवावरच उठल्याचे बोलले जात आहे.

ठेकेदाराला राजकीय अभय

दरम्यान मुबई नाशिक महामार्गांवरील दुरुस्ती असो वा अन्य कुठलेही काम असो एका राजकीय पक्षाच्या पुढऱ्याच्या आशीर्वादाने 10 वर्षा पासून एकाच ठेकेदाराला दिले जाते ह्या ठेकेदारा करवी आज पर्यंत अनेक बोगस कामे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून टोल नाक्याच्या मार्फेत बिल काढली जात आहेत.दरवर्षी दुरुस्ती च्या नावा खाली करोडो रुपये ठेकेदाराला आंदन दिले जात आहेत या प्रकरणी अनेक वाहंचालकांनी नितीन गडकरी यांच्या कडेही थेट तक्रारी केल्या परंतु स्थानिक राजकीय वरद हस्त असल्याने ठेकेदारा वर कारवाईच होत नाही.
 

Web Title: Motorists beware... the road in Kasara Ghat is crumbling, the highway is cracked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.