भाईंदरच्या उत्तन येथे महापालिका डंपिंगमधील कचऱ्याचा डोंगर लगतच्या 8 घरांवर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 01:35 AM2020-07-05T01:35:00+5:302020-07-05T06:43:33+5:30

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पालिकेला घनकचरा प्रकल्पा साठी धावगी डोंगरावरील सरकारी जमीन मोफत देण्यात आली आहे. परंतु पालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वरदहस्ता मुळे सदर जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण झाली आहेत. 

A mound of rubbish from the municipal dumping at Bhayander's Uttan collapsed on 8 nearby houses | भाईंदरच्या उत्तन येथे महापालिका डंपिंगमधील कचऱ्याचा डोंगर लगतच्या 8 घरांवर कोसळला

भाईंदरच्या उत्तन येथे महापालिका डंपिंगमधील कचऱ्याचा डोंगर लगतच्या 8 घरांवर कोसळला

Next

मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील धावगी डोंगरावर असलेल्या डंपिंग ग्राऊंड मधील कचऱ्याचा डोंगर लगतच्या 8 अनधिकृत घरांवर कोसळला. सुदैवाने लोकं आधीच घराबाहेर पडल्याने बचावली असून त्यांनी शेजाऱ्यां कडे आसरा घेतला आहे. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पालिकेला घनकचरा प्रकल्पा साठी धावगी डोंगरावरील सरकारी जमीन मोफत देण्यात आली आहे. परंतु पालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वरदहस्ता मुळे सदर जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण झाली आहेत. 

दुसरीकडे महापालिकेने देखील प्रक्रिया न करताच मोठया प्रमाणात बेकायदेशीर कचरा डंपिंग केल्याने येथे कचऱ्याचे डोंगर उभे झाले आहेत.  दिवसभर कोसळणाऱ्या पावसा मुळे शनिवारी रात्री उशिरा कचऱ्याचा डोंगर लगत असलेल्या अनधिकृत घरांवर कोसळला. कचऱ्यासह पाणी देखील जास्त प्रमाणात आले. कचऱ्याचा डोंगर पडत असल्याचे समजताच 8 घरातील सुमारे 25 जणांनी जिवाच्या भितीने घरा बाहेर पळ काढला. 

कचरा व पाण्याचा प्रवाह वेगाने आल्याने घरांचे नुकसान झाले आहे. पाणी वेगाने वहात होते. लोकां मध्ये घबराट मजली. अग्निशमन दलाचे रवींद्र पाटील, एकनाथ पाटील,  प्रणय पाटील, सिद्धांत रणावरे, मलगोंडा नागोडा व महेश बाघमारे आदिनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.  खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केला असून राहिवाश्याना अन्यत्र हलवण्यात आले आज. 

Web Title: A mound of rubbish from the municipal dumping at Bhayander's Uttan collapsed on 8 nearby houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.