भर पावसात दिव्यांगांचे घरांसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:27+5:302021-07-14T04:44:27+5:30
ठाणे : गेली दोन वर्षे घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दिव्यांगांनी अखेर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी भरपावसात आंदोलन छेडले; मात्र यावेळीदेखील ...
ठाणे : गेली दोन वर्षे घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दिव्यांगांनी अखेर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी भरपावसात आंदोलन छेडले; मात्र यावेळीदेखील महापालिकेने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. महापालिका नेहमीच दिव्यांगांना उपऱ्याची वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
दोन वर्षांपासून बीएसयूपीच्या प्रकल्पात जवळपास १९२ दिव्यांगांना घर देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले होते. यापैकी ३५ जणांना घराचा ताबा दिला. उरलेल्या सगळ्या दिव्यांगांना बेघर होण्याची वेळ आली असून आम्ही नेमके कुठे जायचे असा प्रश्न या आंदोलनादरम्यान त्यांनी केला. कोरोना असल्याने उशीर होत असल्याचे ठामपाने सांगितले; मात्र बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेना, विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंचाचे पदाधिकारी मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांनी कोरोना लवकर जाणार नाही, त्यामुळे आमच्या घरांचा ताबा आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी मागणी केली.