महापौर, सभागृह नेतेपदावर डोळा असल्याने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:23 AM2017-08-02T02:23:16+5:302017-08-02T02:23:16+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांचा रोष हा स्वपक्षाचे महापौर

The movement, since the mayor, the head of the auditorium is the leader | महापौर, सभागृह नेतेपदावर डोळा असल्याने आंदोलन

महापौर, सभागृह नेतेपदावर डोळा असल्याने आंदोलन

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांचा रोष हा स्वपक्षाचे महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव व सभागृह नेते राजेश मोरे यांच्यावर असल्याची चर्चा असून या पदांवर कब्जा करण्याकरिता टपून बसलेल्या काही नगरसेवकांनीच या असंतोषाला हवा दिल्याचे बोलले जाते.
केडीएमसीतील नगरसेविकांची कामे होत नसल्याने त्यांच्यात असलेला असंतोष अलीकडेच महिला आमदारांच्या समितीने त्यांची भेट घेतली तेव्हा प्रकट झाला होता. महापालिकेतील गोल्डन गँगचा सर्व निर्णयांवर वरचष्मा असून आमच्या वॉर्डात निधी मिळत नाही, कामे होत नाहीत, अशी तक्रार नगरसेविकांनी केली होती. सर्वसाधारण सभेतही नगरसेविकांना बोलू दिले जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेतील काही नगरसेवकांचा तसेच काही महत्वाकांक्षी नगरसेविकांचा महापौर, गटनेते व सभागृहनेते या पदावर डोळा आहे. त्यांनीच नगरसेविकांमधील असंतोष हेरुन त्याला हवा दिली व त्याचे रुपांतर आयुक्तांविरुद्धच्या आंदोलनात झाले.
खुद्द आयुक्त वेलरासू हे आपण जेमतेम २० ते २५ दिवसांपूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला असून नगरसेविकांच्या मागण्या गेली दोन वर्षे प्रलंबित असल्याचे सांगतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे आता या सर्व अशोभनीय घटनेची कशी दखल घेतात, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना केडीएमसीत फेरबदल करुन भाकरी परतणार किंवा कसे, याबाबत औत्सुक्य आहे. पक्षात वेगवेगळे गटतट असले व त्यांच्यात मतभेद असले तर अनेकदा ते नेत्यांच्या पथ्यावर पडते. त्यामुळे या सर्व घटनांची फारशी दखल घेतली गेली नाही तर त्याचा अर्थ नेतृत्वालाच अशी अनागोंदी हवी आहे, असे जाणकारांचे मत आहे.

Web Title: The movement, since the mayor, the head of the auditorium is the leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.