प्रशासनाच्या मनमानीविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:54 PM2020-07-01T13:54:08+5:302020-07-01T13:54:13+5:30
या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.
ठाणे : संपूर्ण राज्यात नुकत्याच झालेल्या निर्सग चक्रीवादामुळे खुप मोठे नुकसान झाले. त्यामुळे वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. परंतु तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करण्यास तयार झाले. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती महावितरण प्रशासनाला करण्यात आली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन आपला मनमानी कारभार केल्याचा आरोप महावितरणच्या एमएसईबी वकर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. या कामात सर्वानाच सरसकट कामाला लावले गेले, ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशांना देखील कामाला लावले, परंतु त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पाठविले. परंतु या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.
बुधवारी वागळे इस्टेट भागातील महावितरण कार्यालयाच्या आवारात या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग चक्री वादामुळे नुकसान झाले, अनेक ठिकाणी विजेची हानी झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर तयार होतो. त्यानुसार या कामाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती, आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले होते, तसेच 50 वर्षे वयोगटातील कर्मचा:यांना या कामी पाठविले जाऊ नये असेही सांगण्यात आले होते. परंतु प्रशासनाने मनमानी कारभार करीत सरसकट सर्वानाच कामाला लावल्याचा आरोप यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बनसोड यांनी केला आहे.
किमान गरजा भागविल्या जाव्यात ही हिच्छा होती, त्याला राहण्याची सोय होणो अपेक्षित होते, त्याला अंगोळीचे पाणी मिळणो अपेक्षित होते, जेवणाची सोय, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होते. 10 दिवसासाठी नेले होते, परंतु 30 दिवस उलटूनही त्यांच्याकडून काम करुन घेतले जात असून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, त्यातूनच एकाला अंघोळीचे पाणी मिळाले नाही, तो तलावात गेला आणि त्याचा मृत्यु झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्वाना मुख्यअभिंयता जबाबदार असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी फेडरेशनची असल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तो र्पयत आंदोलन सुरुच राहिल असा इशाराही त्यांनी दिला.