आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध

By नितीन पंडित | Published: June 14, 2024 06:43 PM2024-06-14T18:43:45+5:302024-06-14T18:47:22+5:30

या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

mp balya mama mhatre opposes mla t raja | आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध

आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात सकळ हिंदू समाजाच्या वतीने भव्य सभेचे आयोजन शनिवारी करण्यात आले असून या सभेत तेलंगाना येथील आमदार टी राजा सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. परंतु नवनियुक्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी या कार्यक्रमास विरोध नसून या कार्यक्रमासाठी येणारे टी राजा सिंग यांना विरोध दर्शवला आहे. टी राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कार्यक्रमास त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी बाळ्या मामांनी शुक्रवारी पोलीस यंत्रणेकडे केली आहे. 

या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.हा कार्यक्रम कपिल पाटील यांच्या छुप्या अजेंड्याने आयोजित केला असून पाटील स्वतः या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही परंतु मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरच या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले असा सवाल बाळ्या मामा यांनी उपस्थित करत शहरात जातीय तेढ व भिवंडीत दंगली घडवण्याचा कट  कपिल पाटील करित असल्याचा आरोप खासदार बाळ्या मामा यांनी केला आहे. 

तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह यांच्यावर १०५ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत तर १८ ते २० गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहे . भिवंडी मुस्लिम बहुल शहर आहे आणि अशा ठिकाणी जर जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत असेल तर वातावरण खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या सभेला विरोध नसून या सभेमध्ये वक्तव्य करणारे टी राजा सिंह यांना विरोध असल्याचे बाळ्या मामा यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर अनेक स्टेटस देखील फिरवले जात आहे ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो त्यामुळे सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण पोलीस प्रशासनाकडे केली असल्याचेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

Web Title: mp balya mama mhatre opposes mla t raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.