खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी आयुक्त पी वेलारसु यांनी केली मान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 04:40 PM2017-09-19T16:40:39+5:302017-09-19T16:41:14+5:30

कल्याण डोंबिवली येथील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांना ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण यामुळे अनेक अपघात होत आहेत.

MP Dr. Srikant Shinde's demand was made by Commissioner P Velarasu | खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी आयुक्त पी वेलारसु यांनी केली मान्य 

खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी आयुक्त पी वेलारसु यांनी केली मान्य 

Next

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 19 -  कल्याण डोंबिवली येथील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांना ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण यामुळे अनेक अपघात होत आहेत. याची  गंभीर दखल घेत रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कानउघडणी केली. चक्की नाका ते नेवाळी या मलंगगड भागातील रस्त्याचे काम रखडले असून कल्याण येथील संतोषी माता रोड निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ६ महिन्यातच खराब झाला असल्याचे पुरावे सादर करत सदर रस्त्यांचे  फोटोच आज आयुक्तांसमोर त्यांनी सादर केले. 

कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांबाबत अधिकारी आयुक्तांना अंधारात ठेवत असल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली. यावर गेल्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली महानागर पालिका क्षेत्रात झालेल्या सर्व रस्त्यांच्या कामांची तसेच, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त पी. वेलरासु यांनी  शिंदेना दिले. तसेच उद्यापासून महापालिका क्षेत्रात खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल असे देखील आश्वासन दिले. 

रस्त्यांवरील खड्डे आणि निकृष्ट कामांबाबत जबाबदार असणाऱ्या  अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच, खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरूवात करावी अशी मागणी शिंदे यांनी महापालिका आयुक्त पी वेलारासु यांच्याकडे केली  यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायीसमिती सभापती रमेश म्हात्रे, महानगरप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, परिवहन सभापती संजय पावशे, गटनेता रमेश जाधव, नगरसेवक  दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, दशरथ घाडीगांवकर, सुशीला माळी, शीतल मंढारी, प्रकाश म्हात्रे, युवासेना अधिकारी योगेश म्हात्रे, मुकेश पाटील तसेच, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते.

कल्याण डोंबिवलीची रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. याबद्दल संबंधित अधिकारी केवळ कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. आयुक्तांना अंधारात ठेवण्याचे काम इथल्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. जनतेच्या पैशांची अशातऱ्हेने चाललेली उधळपट्टी थांबवा, अशी सक्त ताकीद पालिका प्रशासनाला देत रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची खा.डॉ.शिंदे यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. 

नव्याने अलिकडेच बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा डिफेक्ट लायबिलिटी कालावधी पकडून किमान ४ वर्ष तरी रस्ते टिकण्याची हमी घेतलेली असताना रस्ते ६ महिन्यातच खराब होत असून याबाबत पालिका अधिकारी निष्क्रिय असल्याकडे त्यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले.  
कल्याण येथील संतोषी माता रोड निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ६ महिन्यातच खराब झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. चक्की नाका ते नेवाळी हा मलंगगड भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात यांची गंभीर दखल घेत बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. 

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकरता १२ कोटींचे बजेट महापालिकेने मंजूर केले असून १२ अभियंते आणि ६ एजेंसी पालिकेकडे आहेत त्या तातडीने कामाला लावून १२ ठिकाणी हे काम युद्धपातळीवर सुरु करावे असे  ते म्हणाले.

तसेच कल्याण येथील स्काय वॉक चे काम खूप धीम्या गतीने सुरू असल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास  आणून दिले याबाबतही खा. डॉ.शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. यावर स्काय वॉक चे काम येत्या मार्च पर्यन्त पूर्ण करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.

पेंढारकर महाविद्यालयासमोरील रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
पेंढारकर महाविद्यालायकडून स्टेशनच्या दिशेने जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता होती. मात्र, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे महापालिकेला येथे काम करता येत नव्हते. खा. डॉ. शिंदे यांनी काल, सोमवारी अधीक्षक अभियंते नाना पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवारी या कामाला सुरुवात झाली असून खा. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी या कामाची पाहाणी केली.

Web Title: MP Dr. Srikant Shinde's demand was made by Commissioner P Velarasu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे