खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रीपदी संधी देण्याची मागणी!
By सुरेश लोखंडे | Published: June 8, 2024 07:02 PM2024-06-08T19:02:27+5:302024-06-08T19:03:58+5:30
यासाठी शिवसेनेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल.असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असेदेखील रायमुलकर यांनी स्पष्ट केले.
ठाणे : नुकताच झालेल्या निवडणुकीत बुलढाणा येथून प्रतापराव जाधव शिंदे सेनेतून विजयी झाले आहेत. त्यांना यांना केंद्रीय मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी. अशी मागणी करण्यासाठी मेहेकर मतदारसंघातील शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात शनिवारी भेट घेतली. यासाठी शिवसेनेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल.असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असेदेखील रायमुलकर यांनी स्पष्ट केले.
सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी, रविवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे सेनेतील खासदारांना मंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला दोन मंत्री पदे येऊ शकतात.यात एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदाचा समावेश असू शकतो. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या कॅबिनेट मंत्रीपदावर सलग चौथ्यांदा निवडून आलेले बुलढाण्याचे खासदार जाधव यांना काम करण्याची संधी द्यावी. अशी विनंती करण्यासाठी आमदार रायमुलकर आणि त्यांच्या समर्थकांनी शनिवारी मुख्यर्त्र्र्यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा आणि विदर्भातून निवडून आलेले एकमेव शिवसेनेचे खासदार जाधव यांना कॅबिनेट मंत्रीपदावर काम करण्याची संधी दया.अशी विनंती आमदार रायमुलकर यांनी केली आहे.