सातपाटीतील ‘त्या’ बोटीची खासदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:03 AM2020-08-12T00:03:12+5:302020-08-12T00:03:17+5:30

कर्ज माफ करा : बंधाऱ्यावर आदळून फुटली बोट

MPs inspect 'that' boat in Satpati | सातपाटीतील ‘त्या’ बोटीची खासदारांकडून पाहणी

सातपाटीतील ‘त्या’ बोटीची खासदारांकडून पाहणी

Next

पालघर : सातपाटीच्या किनाºयावरील दगडी बंधाºयावर आदळून फुटलेल्या ‘प्राजक्ता’ नौकेची खासदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी पाहणी करून मत्स्यव्यवसाय विभागाने पदुम विभागाच्या शासन निर्देशाप्रमाणे त्या कुटुंबीयांवरील राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेंतर्गत (एनसीडीसी) कर्ज आणि व्याज निर्लेखित करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

अरबी समुद्रात वादळी वाºयाने ५ आॅगस्टला सातपाटीच्या किनाºयावरील दगडी बंधाºयावर आदळून मच्छीमार मोरेश्वर चौधरी यांची ‘प्राजक्ता’ ही मासेमारी नौका फुटली होती. शासनाच्या एनसीडीसी योजनेंतर्गत सुमारे २० लाखांचे कर्ज आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहकारी संस्थेद्वारे घेतलेले पाच लाखांच्या कर्जातून ही नौका बांधली होती. खासदार गावित, तहसीलदार सुनील शिंदे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, कृती समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती मेहेर, मंडळ अधिकारी मनोहर वसावे आदींनी सोमवारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी प्राजक्ता बोटमालकावरील सुमारे २० लाखाचे कर्ज आणि मासेमारी व्यवसायासाठी घेतलेले पाच लाखाचे कर्ज माफ करण्याबाबत प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना खा. गावितांनी उपस्थित अधिकाºयांना दिल्या.

या निर्णयाचा आधार
शासनाने २ मे २०१८ रोजी एनसीडीसी-अंतर्गत मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण करणे व यासाठी मच्छीमारांना अर्थसाहाय्य मंजूर करताना स्थावर व जंगम मालमत्ता तारण ठेवण्यासंबंधी कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या नियमित वसुलीबाबत सुधारित अटी व शर्तीबाबत शासन निर्णय काढला होता. या निर्णयाच्या प्रस्तावनेतील १४ क्रमांकाच्या मुद्द्यात १९७६ पूर्वीच्या या योजनेअंतर्गत बांधलेल्या तसेच त्यानंतरही बांधलेल्या आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णत: निकामी झालेल्या किंवा गटप्रमुख व गट सदस्य हयात नसल्यास नौकेची सध्याचे विक्र ी मूल्य विचारात घेऊन कर्ज, व्याज निर्लेखनास मान्यता देत असल्याचा उल्लेख आहे.

Web Title: MPs inspect 'that' boat in Satpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.