ठाणे पूर्वेच्या सॅटीसचा मार्ग मोकळा करण्यासाठी खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:12 PM2018-02-14T18:12:17+5:302018-02-14T18:14:38+5:30

ठाणे पूर्वेच्या सॅटीस संदर्भात नुकतीच खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे कडून बांधकाम करण्यास मंजुरी लवकरच देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

MPs visit railway station to open the path of Thane East | ठाणे पूर्वेच्या सॅटीसचा मार्ग मोकळा करण्यासाठी खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

ठाणे पूर्वेच्या सॅटीसचा मार्ग मोकळा करण्यासाठी खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Next
ठळक मुद्दे२ किमीचा २७० मीटर लांबीचा एलीवेटेड मार्ग२६६ कोटींचा खर्च अपेक्षित

ठाणे - ठाणे पूर्वेच्या सॅटीस मार्ग आता आणखी सुखर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या सॅटीस संदर्भात खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. या बैठकीत गोयल यांनी या प्रकल्पाबाबत अनुकुलता दर्शवली असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता देण्याचे आश्वासन दिल्याचेही विचारे यांनी सांगितले.
                  ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे पूर्व येथे सॅटीस प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यामध्ये रेल्वेच्या काही भागाचा देखील समावेश आहे. हा संपूर्ण २ किमी २७० मीटर लांबीचा संपूर्ण एलीवेटेड मार्ग असणार आहे. त्यामध्ये हायवे सर्व्हीस रोड येथील गुरु द्वारा पासून सुरु होणारा पूल रेल्वे लाईन ओलांडून स्टेशन पर्यंत असा १ किमी ८०० मीटर चा हा मार्ग असणार आहे. या मार्गाची रु ंदी १२ मीटर असून हा तीन लेन चा असणार आहे. तसेच स्टेशन परिसरात डेक तयार करून पीपीपी तत्वावर व्यावसायिक इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीला तीन एफ एस आय राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे. तसेच या इमारतीतून बाहेर निघणारा पूल ४७० मीटरचा असणार आहे. त्याठिकाणी पुढे मंगला हायस्कूल शेजारी असलेल्या ६८०० चौ. मीटर च्या भूखंडावर मिनी डेपो तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात येणारी वाहने प्रवाशांना त्या ठिकाणी सोडून पुढे जाऊन डेपोकडून वळसा घेऊन बस पुन्हा फिरवल्या जाणार आहेत. तसेच खाजगी वाहने सरळ खाली उतरून कोपरी गाव मार्गे बाहेर काढण्यात येणार आहेत. केवळ व्यावसायिक इमारत सोडून या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजीत खर्च हा २६६ कोटी एवढा असणार आहे. यासाठी महापालिकेने हा प्रकल्प राबवीत असताना स्मार्ट सिटी अंतर्गत याला मंजुरीही मिळाली आहे.
                    दरम्यान या व्यावसायिक इमारतीसाठी लागणारी जागा रेल्वे हद्दीतील असल्याने त्याला रेल्वे कडून बांधकाम करण्यास मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने याला मंजुरी लवकरच देऊ असे आश्वासन रेल्वेमंत्री गोयल यांनी दिले आहे.



 

Web Title: MPs visit railway station to open the path of Thane East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.