‘एमपीएससी’चे ७,९२७ परीक्षार्थी
By admin | Published: April 1, 2017 11:34 PM2017-04-01T23:34:45+5:302017-04-01T23:34:45+5:30
येथील २२ परीक्षा केंद्रांवर ‘राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१७’ ही स्पर्धा परीक्षा २ एप्रिल रोजी घेतली जात आहे. राज्यभरातील सात हजार ९२७ पात्रताधारकांकडून ही परीक्षा दोन सत्रांत दिली जात आहे.
ठाणे : येथील २२ परीक्षा केंद्रांवर ‘राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१७’ ही स्पर्धा परीक्षा २ एप्रिल रोजी घेतली जात आहे. राज्यभरातील सात हजार ९२७ पात्रताधारकांकडून ही परीक्षा दोन सत्रांत दिली जात आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात पार पडणाऱ्या या परीक्षेदरम्यानच्या अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी पदांसाठी ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेतली जात आहे. सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत पहिले, तर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत दुसरे सत्र या दोन सत्रांत ती घेतली जाणार आहे. यासाठी २२ परीक्षा केंद्रांवर ६५० मनुष्यबळाचा वापर करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रातील इमारतीमधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून सार्वजनिक शांतताभंग होण्याची दाट शक्यता आहे. यास आळा घालण्यासाठी या परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राहावी, म्हणून २ एप्रिलला सकाळी ७ ते संध्या. ६ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
याशिवाय झेरॉक्स, फॅक्स सेंटर, मोबाइल फोन, लॅपटॉप, मायक्रोफोन इत्यादी साधनांद्वारे गैरप्रकार केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी १०० मीटर परिसरातील बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास व तत्सम साधनांचा वापर करण्यास सदरची दुकानसेवा बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केले आहेत. (प्रतिनिधी)