भोपरमध्ये गळतीमुळे रस्त्यावर चिखल; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:31 PM2020-01-01T23:31:01+5:302020-01-01T23:31:04+5:30

त्वरित दुरुस्ती करण्याची महापालिकेकडे मागणी

Mud on the road due to leakage in the loaf; Citizens suffer | भोपरमध्ये गळतीमुळे रस्त्यावर चिखल; नागरिक त्रस्त

भोपरमध्ये गळतीमुळे रस्त्यावर चिखल; नागरिक त्रस्त

Next

डोंबिवली : भोपर प्रभागात पाणीटंचाईची समस्या असतानाच गळतीमुळे अनेक लीटर पाणी वाया जात आहे. गजानन चौक परिसरात नळजोडण्यांमधून होणाऱ्या गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यात रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल होत असल्याने पादचाऱ्यांना त्यातूनच वाट काढावी लागत आहे.

पाणीगळतीमुळे टंचाईची समस्याही येत असून याबाबत नगरसेविका रविना माळी यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात नगरसेविका माळी यांनी वेळोवेळी ई-प्रभागातील पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाºयांना सूचित केले आहे. पण, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता थेट पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रभागातील नागरिकांचे गाºहाणे मांडणार असल्याचे सांगण्यात आले. रस्त्यावर येणाºया या पाण्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्कील झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

भोपरमध्ये पाण्या संदर्भातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या वाहिन्या बदलून तेथे नवीन वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पाणीगळती होत आहे. ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल.
- विजय पाटील, सहअभियंता, पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी

Web Title: Mud on the road due to leakage in the loaf; Citizens suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.