मुकादम पोकलेन मशीनच्या धक्क्याने गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:38+5:302021-06-01T04:30:38+5:30

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ परिसरात नालेसफाई सुरू असताना पोकलेन मशीनचा धक्का लागून महापालिका मुकादम जखमी झाला. याप्रकरणी पोकलन ...

Mukadam Poklen seriously injured by machine shock | मुकादम पोकलेन मशीनच्या धक्क्याने गंभीर जखमी

मुकादम पोकलेन मशीनच्या धक्क्याने गंभीर जखमी

Next

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ परिसरात नालेसफाई सुरू असताना पोकलेन मशीनचा धक्का लागून महापालिका मुकादम जखमी झाला. याप्रकरणी पोकलन चालकाविरोधात उशिराने गुन्हा दाखल झाला असून कामगार संघटनेने पोखलन ठेकेदाराला दवाखान्यात येत असलेल्या खर्चाची मागणी केली.

उल्हासनगर कॅम्प नं. ५ इंदिरानगर गॅस गोडाऊन परिसरात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता पावसाळ्यापूर्वीचे नाले सफाईचे काम पोकलेन मशीनद्वारे सुरू होते. त्यावेळी कामाची देखरेख करणारे महापालिका मुकादम संतोष दादू क्षेत्रे उपस्थित होते. पोकलेनचालक त्र्यंबक ज्ञानदेव गाढवे यांनी पोकलन मशीन बंद करून मुकादम यांना नालीची भिंत पडते का बघा, असे सांगितले. मुकादम भिंत बघण्यासाठी फिरले असता पोकलेन चालकाने काही एक कल्पना न देता पोकलेन मशीन सुरू केली. मशीनचा जोरदार धक्का लागल्याने, छाती व बरगड्याला मार लागून फ्रॅक्चर झाले. मुकादम संतोष क्षेत्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोकलेन ठेकेदाराने रुग्णालयाचा सर्व खर्च करावा, अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी केली. तसेच ठेकेदारावर आयुक्तांनी कारवाई न केल्यास आंदाेलनाचा इशारा दिला. पालिका उपायुक्त मदन साेंडे यांनी या प्रकाराची चाैकशी करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Mukadam Poklen seriously injured by machine shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.