Mira Bhayander: पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:31 PM2023-04-03T22:31:10+5:302023-04-03T22:31:14+5:30

Mira Bhayander: वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या पोलीस भरती साठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या १२ हजार १२७ पात्र उमेदवारां पैकी ९ हजार ९९९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २ हजार १२८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.

Mumbai: 2000 eligible candidates absent from police recruitment written exam | Mira Bhayander: पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित

Mira Bhayander: पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित

googlenewsNext

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या पोलीस भरती साठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या १२ हजार १२७ पात्र उमेदवारां पैकी ९ हजार ९९९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २ हजार १२८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.

पोलीस आयुक्तालयात रिक्त पोलीस शिपाई, वाहन चालक च्या एकूण ९९६ पदांसाठी ७३ हजार २२१ अर्ज आले होते. शारीरिक चाचणी मध्ये ३५,९५६ उमेदवार पात्र ठरले होते. पडताळणी नंतर लेखी परीक्षेसाठी १२,१२७ इतकेच पात्र उमेदवार राहिले होते. मात्र २ एप्रिल रोजीच्या लेखी परीक्षेसाठी ७,७२१ पुरुष तर २,२७८ महिला असे एकूण ९ हजार ९९९ उमेदवारच लेखी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजे २ हजार १२८ उमेदवार गैरहजर राहिले. महिलांसाठी भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात तर पुरुषांच्या साठी पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता जेणेकरून परीक्षा शांततेत पार पडली. 

Web Title: Mumbai: 2000 eligible candidates absent from police recruitment written exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.