कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात नागरीकांना केला अटकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 08:04 PM2020-04-15T20:04:33+5:302020-04-15T20:05:26+5:30

मुंब्रा कौसा भागात कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना येथील रहिवाशांनी सर्व्हे करण्यास अटकाव केल्याची माहिती पुढे आली आहे. या शिक्षकांच्या हातातील कागद फाडून टाकत, त्यात खाडाखोड करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

Mumbai: Citizens who have gone to survey for Corona have been arrested in Mumbai | कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात नागरीकांना केला अटकाव

कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात नागरीकांना केला अटकाव

Next

ठाणे : मुंब्य्रात कोरोना रु ग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे येथील रहिवाशांच्या मानसिकतेमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवावर उदार होऊन मुंब्रा कौसात कोरोनाची लक्षणे कोणाला आहेत का याचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना सर्व्हेसाठीपुन्हा आलात तर खबरदार अशी धमकी देत चक्क सर्व्हेचा कागद फाडण्यापर्यंतची मजल कौसातील नागरिकांची गेली आहे. कौसा भागातील नशेमन अपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला असून अशाप्रकारे जर सर्व्हेला विरोध होत असेल तर मुंब्य्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
                     ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मुंब्रा आण िकळव्याचे आहेत. कळवामध्ये १५ तर मुंब्य्रात १७ कोरोना पॉझीटीव्ह रु ग्णांची संख्या असून दिवसेंदिवस या भागात हा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे मुंब्रा कौसा भागात कोरोनाची लक्षणे कोणत्या नागरिकाला आहेत का? याची तपासणी करण्यासाठी सर्व्हे सुरु आहे. बुधवारी १२.३० च्या सुमारास कौसा येथील नशेमन अपार्टमेंटमध्ये सर्व्हेसाठी गेलेल्या शिक्षकांना नागरिकांकडून चक्क धमकवण्याचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी पुन्हा सर्व्हेसाठी आलात तर खबरदार असे सांगत सर्व्हेचा कागद फाडण्यात आला आहे. सर्व्हे केलेल्या कागदावरही देखील खाडाखोड करण्यात आली आहे. सर्व्हेसाठी शिक्षकांनी न येता मेडिकलच्या स्टाफने यावे असा दम देखील इथल्या नागरिकांनी या शिक्षकांना भरला आहे. या सर्व प्रकरणानंतर आता शिक्षांकडून पोलीस संरक्षणाची मागणी होऊ लागली आहे.

  •              
    मुंब्य्रात सर्व्हेला विरोध होत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या- त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलीस तक्र ार करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व्हेला अडथळा येण्याची शक्यता आहे. मात्र जर कोणी जाणूनबुजून या सर्व्हेला विरोध करत असेल तर ३५३ दाखल करण्यात येईल. यापूर्वी दोघांच्या विरोधात तशा स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात दाखल करण्यात आला असून बुधवारी देखील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- मनीष जोशी, उपायुक्त, ठा.म.पा


  • हे राष्ट्रीय काम असून शिक्षक आपल्या जीवववर उदार होऊन हे काम करत आहेत. एकमेकांच्या संपर्कात येऊन या रोगाचा प्रसार वाढत असल्याने हा सर्व्हे अत्यंत महत्वाचा आहे. मात्र अशा प्रकारे जर विरोध होत असेल तर त्यांना पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे . महापौर म्हणून मी पाठपुरावा करणारच आहे मात्र प्रशासनाने देखील ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी.

- नरेश म्हस्के, महापौर, ठा.म.पा
 

Web Title: Mumbai: Citizens who have gone to survey for Corona have been arrested in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.