मुंबईतील कोरोनाग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर ठाण्यात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:48 AM2020-04-27T04:48:16+5:302020-04-27T04:48:31+5:30
मुंबईत आतापर्यंत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाºयाला लक्षणे दिसताच त्यांना तातडीने या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाणे : मुंबईतील एका पोलीस निरीक्षकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ठाण्यातील होरायझन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबईत आतापर्यंत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाºयाला लक्षणे दिसताच त्यांना तातडीने या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात निरीक्षक असलेल्या या अधिकाºयाकडे मुंबईतील एका बँक घोटाळ्याचा तपास आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना वारंवार संबंधित बँकेत चौकशीसाठी जावे लागत होते. तेथील एका मधुमेही कर्मचाºयाला लागण झाली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर या अधिकाºयासह या बँक घोटाळ्याचा तपास करणाºया पथकातील आठ जणांची तपासणी केली. त्यात या निरीक्षकासह दोघे जण पॉझिटिव्ह आढळले.
ठाण्याच्या मुल्लाबाग परिसरातील एका इमारतीमध्ये राहणाºया या निरीक्षकाला आता ठाण्यातील होरायझन या खासगी रुग्णालयात २४ एप्रिल रोजी दाखल केले. ते वास्तव्यास असलेली इमारत आणि परिसरही चितळसर पोलिसांनी सील केला आहे. त्यांची पत्नी आणि मुलाला घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.