मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा
By पंढरीनाथ कुंभार | Published: December 21, 2017 10:58 PM2017-12-21T22:58:27+5:302017-12-21T23:12:20+5:30
मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा
मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी
बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा
भिवंडी : गेल्या काही महिन्यापासून मुंबईतील गोवंशाची कत्तल करणारे कत्तलखाने बंद झाल्याने मुंबईतील लोकांची गोवंश मासांची मागणी पुर्ण करण्यासाठी मुंबई बाहेरून गोवंश मांसाची वहातूक करण्याचा नवीन व्यवसाय काही तस्करांनी सुरू केला आहे.त्यासाठी हे व्यावसायीक क्लुप्त्या लढवीत विविध मार्गांचा अवलंब करीत आहे. परंतू मांसाने भरलेल्या गाड्या अडवून बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांकडून या व्यवसायास खीळ घातली जात आहे.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गोवंश मांसाची तस्करी करणारे टेम्पो पोलीसांना हुलकावणी देत महामार्गावरून मुंबईस जाण्यासाठी भिवंडीकडे येतात. त्यापैकी काही मुंबईतील बाजारात पोहोचतात.तर काही बजरंगदल कार्यकर्त्याच्या सतर्कामुळे पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले जातात.अशा घटना गेल्या सहा महिन्यात अनेकवेळा घडल्या आहेत.भिवंडीमार्गे मुंबईला हे मांस (बीफ) नेणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे असल्याने काही तस्करांनी तालुक्यातील काही भागात कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.परंतू हा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला.अशाच प्रकारे गोवंशमासांने भरलेला टेम्पो मुंबईकडे जात असतान काल रात्री पडघा टोलनाक्यावर बजरंग दल कार्यकर्ते व पोलीसांनी पकडून जप्त केला.या घटनेमुळे गोमांस तस्करी करणाºया कसायांमध्ये खळबळ माजली आहे.
संगमनेर येथुन गोवंश मांसाने भरलेला टेम्पो मुंबईतील गोवंडी येथे जात असल्याची माहिती बजरंगदलाचे कार्यकर्ते यतींद्र जैन यांना मिळाली.त्यांनी रितेश ठक्कर,रमेश ठाकरे,निलेश ठाकरे या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पडघा टोल नाक्याजवळ सापळा लावून रात्री तीन वाजताच्या सुमारास टोलनाक्यावर टेम्पो येताच कार्यकर्त्यांनी टेम्पो चालकास टेम्पो थांबविण्यास सांगीतले.कोणासही संशय येऊ नये म्हणून टेम्पोच्या मागील बाजूस भंगाराची गोणपाट लावले होते.परंतू टायरखाली मांस दिसल्याने कार्यकर्त्यांनी ताबडतोब पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक पोकळे यांना घटनास्थळी बोलाविले आणि माहिती टेम्पोतून गोवंशमासांची तस्करी होत असल्याची माहिती दिली.पोलीसांनी चालक नदीम अजगर अली अहमद सय्यद व क्लिनर अब्दुल लतीफ खलील शेख यांना ताब्यात घेऊन टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावरांचे अवयव व मांस भरलेले दिसून आले.संगमनेर येथील कसाई वसीम कुरेशी यांनी स्वत:च्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये ४०-५० गोवंशाचे वासरू कापून गाडीत भरून ते गोवंडी येथे अकबर कुरेशी यांच्याकडे पोहचविण्यास सांगीतले,अशी माहिती चालक नदीम सय्यद याने दिली.या प्रकरणी गोवंशमासांची बेकायदेशीर वहातूक करणाºया चालक व क्लिनर विरोधात पडघा पोलीस ठाण्यात पोलीसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली.