कामचुकारपणामुळे मुंबई-नाशिक महामार्गाची झाली चाळण, वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:21 AM2020-12-10T02:21:01+5:302020-12-10T02:22:01+5:30

Mumbai-Nashik highway News :

Mumbai-Nashik highway News | कामचुकारपणामुळे मुंबई-नाशिक महामार्गाची झाली चाळण, वाहनचालक त्रस्त

कामचुकारपणामुळे मुंबई-नाशिक महामार्गाची झाली चाळण, वाहनचालक त्रस्त

Next

कसारा : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग देशातील महत्त्वाचा आहे. परंतु कामचुकार व्यवस्थापन व कंत्राटदार कंपनीच्या बेबंदशाहीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची एक ते दीड वर्षापासून पूर्णतः चाळण झाली आहे. गोंदे ते पडघादरम्यान या महामार्गावरील दोन्ही मार्गिका वाहनचालक व प्रवाशांसाठी अपघातासाठी आमंत्रण ठरत आहेत.

या महामार्गावर गोंदे (नाशिक) ते पडघा (ठाणे) यादरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघाल्याने रस्ते खडबडीत झाले आहेत तर डांबरच निघाल्याने दुचाकीच्या अपघातांत वाढ झाली आहे. वर्षभरात २५० हून अधिक दुचाकींचे अपघात झाले असून १५० हून अधिक छोट्यामोठ्या वाहनांचे अपघात झाले आहेत. रस्ता तर सुरक्षित नाहीच, पण अपघातग्रस्तांना पिक इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीकडून वेळेवर मदत मिळत नाही. त्यातच या महामार्गावरील कसारा घाटाची तर अवस्था आणखी वाईट आहे. आठ किलोमीटरच्या जुन्या घाट क्षेत्रात २०१९ मध्ये रस्ता खचला तो अद्याप पूर्ण व्यवस्थित झाला नसून घाट रस्त्यात अनेक ठिकाणी रस्त्याची समानता सुटली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाडीचे टायर फुटून कायम अपघात होतात. घाट रस्त्याला दरीच्या बाजूने दरवर्षी लाखो रुपये खर्चून संरक्षक कठडे बांधण्यात येतात. परंतु त्या एकाही संरक्षक भिंतीला लोखंडी सळया न वापरल्याने तसेच त्या पूर्णतः निकृष्ट असल्यामुळे थोड्या धक्क्यानेही ढासळतात. या निकृष्ट कठड्यामुळे आठ ट्रक, कार कठडे तोडून खोल दरीत कोसळल्या आहेत.

या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले पॅच दुचाकी व छोट्या कारचालकांसाठी जीवघेणे ठरत असले तरी याकडे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, पोलीस प्रशासनाने अनेकदा तक्रारी व निवेदने दिली. परंतु त्यांना कायम केराची टोपली दाखविण्यात आली आहे. 

महामार्गावर अनेक त्रुटी
महामार्गावर ब्लीनकर लाईट, दिशादर्शक बोर्ड, रबरिंग स्पीड ब्रेकर, धोक्याच्या वळणावर सूचना फलक यासह अनेक त्रुटी आहेत. याबाबत प्रकल्प व्यवस्थापक राकेश ठाकूर यांना वारंवार फोन केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
 

Web Title: Mumbai-Nashik highway News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.