काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:10 AM2018-03-04T02:10:26+5:302018-03-04T02:10:26+5:30

थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

 Mumbai seized from Mumbai, Thane charas sale, three arrested, 32 lakhs of money seized | काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

Next

ठाणे : थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम चरस या अमली पदार्थासह ३२ लाख ४० हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ३१ कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्य्रातील मित्तल ग्राउंड येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर काही व्यक्ती चरसच्या विक्रीसाठी १ मार्च रोजी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा भागाकडे जाणाºया रस्त्यावर उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश महाजन, विकास बाबर आदींच्या पथकाने सापळा लावून गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता साजीद (रा. अमृतनगर, मुंब्रा) याच्या ताब्यातून ८०० ग्रॅम चरस, अब्दुल गुजली (रा. संबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून आठ हजार ८०० ग्रॅम चरस आणि मोहम्मद मुक्ता (रा. पहिलपोरा, जि. गंधरबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून सहा हजार १०० ग्रॅम चरस असे ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रुपयांची रक्कम असा ऐवज जप्त केला. त्यांनी हे चरस जम्मू-काश्मीर येथून आणल्याची कबुली दिली. या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामागे आणखी कोणती टोळी सक्रिय आहे का? किती दिवसांपासून ते ही तस्करी करत होते, या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.

कोणत्या देशांमध्ये अधिक मागणी
चरस या अमलीपदार्थाची हॉलंड, कॅनडा या देशांमध्ये अधिक मागणी असते. चरस हा उच्च प्रतीचा मानला जातो. भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्याची प्रामुख्याने निर्मिती होते. काश्मीरमधून
७० ते ८० हजारांमध्ये खरेदी केल्यानंतर अब्दुल गुजली आणि त्याचे साथीदार ते मुंबई, ठाण्यासह देशभरात दोन लाख रुपये किलोच्या दराने विक्री करत होते. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मात्र याच चरसचा दर किलोमागे दोन कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Mumbai seized from Mumbai, Thane charas sale, three arrested, 32 lakhs of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.