मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत- CM एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Published: March 4, 2023 08:29 PM2023-03-04T20:29:08+5:302023-03-04T20:29:45+5:30

ठाण्यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Mumbai-Thane twin cities, both cities should be pothole-free in the next two and a half years says CM Eknath Shinde | मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत- CM एकनाथ शिंदे

मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत- CM एकनाथ शिंदे

googlenewsNext

अजित मांडके, ठाणे: हा एक आनंदाचा दिवस आहे. विविध कामाचे लोकपर्ण केले, गावदेवी पार्किंग गरज मैदान सुरक्षित ठेवून कोलशेत, कळवा, शिवाजी रुग्णालय, परिवहन बस प्रदूषण मुक्त करण्याचे पहिले पाऊल. बदल झाला आहे ना बदलत ठाणे, 391 रस्ते भूमिपूजन झाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, खड्यातून प्रवास अनेकांचे बळी गेले, आपले सरकार आले मुंबई खड्डे मुक्त करायची आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार, विविध उपक्रम सुरू आहेत. ठाणे वंचित ठेवता येणार नाही. मुंबई ठाणे जुळी शहरं आहेत, त्यामुळे ठाणे खड्डेमुक्त करायचं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

"तलाव सुशोभीकरण काम घेतले आहे. ठाणे मध्ये इतर शहरांच्या तुलनेत जास्त तलाव आहेत, जोगील तलाव पुनर्जीवित करत आहोत, मासुंदा तलाव साफ करूया दिघे यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर आपण तलाव साफ केला, रोज जरा जास्त भाषण करावे लागत आहे, त्यामुळे तलाव शहर ही ओळख पुसू द्याची नाही, रस्ते चंगले, स्वछता प्रधान्य द्या, सार्वजनिक शौचालय स्वच्छ झाले पाहिजे त्या नुसार काम सुरू आहेत, पहिला झोपडपट्टी भागात चांगले पब्लिक टॉयलेट नियमित स्वछता ठेवा, हायवे ला ठेवा," असे त्यांनी सांगितले.

"बदलत ठाणे रस्ते पावसल्यावरवी करा, एन्ट्री पॉईंट करा ठाणे शहराची ओळख दिसली पाहिजे, पहिली सत्ता ठाणे ने दिली. गेले अनेक वर्षे भगवा झेंडा कायम ठेवनचह्ये काम वाहतूक कोंडी मधून सुटका द्यायची आहे, शहराच्या बाहेरून वाहतूक नायची आहे सर्व योजना देण्याचे काम करत आहोत. शासनाकडून निधी मिळाला, त्याचा योग्य विनियोग करा लोकांसाठी पैसा वापरला गेला पाहिजे, डॉक्टर चांगले काम करत आहेत, त्यामुळे जे त्यांना सुविधा देत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे देत आहोत आशा परिस्थिती मध्ये रस्ते, प्रकल्प चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे जे कामात कसूर करत असतील त्यांच्यावर कारवाई करा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अधिकाऱ्याने चांगली भावना जपली पाहिजे तर शहर आणि जिल्हा यांचा विकास होईल. फ्री वे चा रस्ता हा ठाणे पर्यंत आणत आहोत, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता करत आहोत, त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते राज्य शासन देईल," असा विश्वास त्यांनी दिला.

"नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे ठाणेकर मुख्यमंती झाला आहे त्यामुळे विकासा पासून वंचीत ठेवले जाणार नाही, कचरा नको, ठाण्याचा चेहरा बदलला पाहिजे चांगली कामे झाली पाहिजे. आता चित्र बदलत आहे, त्याची सुरवात झाली आहे, सर्व बाबीवर बारकाईने लक्ष द्या आपण नागरिक देखील जबाबदारी आहे आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. महत्वाचा विषय क्लस्टरचा यासाठी सिडको ला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, रहिवाशी माध्यामातून अडचणी दूर लवकरच त्या कामाला सुरुवात करू शकतो. तातडीने या कामाला सुरुवात करा, चालना देऊया," असेही ते म्हणाले.

Web Title: Mumbai-Thane twin cities, both cities should be pothole-free in the next two and a half years says CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.