मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा
By सुरेश लोखंडे | Published: October 6, 2023 08:15 PM2023-10-06T20:15:56+5:302023-10-06T20:16:41+5:30
अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे: मुंबई, ठाण्याला वर्षेभर होणार सुरळीत पाणीपुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे भातसा, बारवी, आंध्रा आदी मोठमोठे धरण प्रकल्प यंदाही 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्याला यंदाही वर्षे भर सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.
सर्वात मोठ्या भातसा धरणात 939.751 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. या धरणात आजपर्यंत पाऊस 2679मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी – 142 मीटर झाली आहे. अप्पर वैतरणात पाणीसाठा- 330.460 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. एकूण पाऊस 3615 मिमी. पडलेला आहे. धरणाची आजची पाणी पातळी - 603.50 मीटर झाली आहे.मध्य वैतरणा पाणीसाठा- 190.40 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. आजपर्यंत 2500 मिमी. पाऊस पडला आहे. धरणाची पाणी पातळी – 284.52, मीटर स्थीर आहे.
जिल्ह्यातील सर्व शहरांना व एम आयडीसीला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणात 336.450 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. जून पासून पाऊस मि.मि.- 3058 मिमी. पडलेला आहे. त्यामुळे या धरणाची आजची पाणी पातळी - 72.43 मीटर झालेली. या धरणातून काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.