Mumbai Train Update : इंद्रायणी एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 10:41 IST2019-09-07T10:36:22+5:302019-09-07T10:41:50+5:30
ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Train Update : इंद्रायणी एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी (7 सप्टेंबर) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. अंबरनाथ ते बदलापूर स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडली आहे. यामुळे अनेक लोकल गाड्याही अडकल्या आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी इंद्रायणी एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ ते बदलापूर स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. नवीन इंजिन जोडून गाडी पुढे काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Mumbai Train Update : इंद्रायणी एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ ते बदलापूर स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडली #CentralRailway#Localpic.twitter.com/t2MFYU53yS
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2019
मुंबईसह उपनगरांत बुधवारी जोरदार पाऊस कोसळत होता. तसेच अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला. मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच विक्रोळी-कांजुरमार्गदरम्यान पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हार्बर मार्गावरील वाशी त सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नालासोपारा स्टेशनवर रुळावर पाणी साचलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती.