Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 09:17 AM2024-09-11T09:17:42+5:302024-09-11T09:18:48+5:30
Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. टिटवाळा स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडली आहे. यामुळे अनेक लोकल गाड्याही अडकल्या आहेत. तसेच कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी टिटवाळा स्टेशन दरम्यान गीतांजली एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंजिनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा स्टेशनदरम्यान गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बिघाड. कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प#MumbaiTrainUpdate#CentralRailway#Mumbai#Local
— Lokmat (@lokmat) September 11, 2024
मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांत २६ हजार ५७२ प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात ही धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे.
मध्य रेल्वेवर १५ वर्षांत २९ हजार मृत्यू
मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर १५ वर्षांत २९ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशी ऋषन यांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर अपघाती बळींची संख्या अधिक आहे. २००९ ते जून २०२४ दरम्यान रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून खाली पडणे, खांबाला धडकणे, प्लॅटफॉर्म व फुटबोर्डच्या जागेत सापडणे आदी अपघातांत २९,३२१ प्रवाशांचा मृत्यू झाला.