मुंब्य्रात स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करण-या नराधम पित्याला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 09:22 PM2018-01-22T21:22:21+5:302018-01-22T21:29:48+5:30
महिलेच्या खूनाचा तपास करतांनाच मुंब्रा पोलिसांनी मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेखला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून लवकरच पत्नीच्या खून प्रकरणातही अटक केली जाणार आहे.
ठाणे: स्वत:च्याच मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण-या नराधम पित्याला आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याला आता पत्नीच्या खून प्रकरणातही अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात शिर आणि पाय नसलेले एका महिलेचे धड पोलिसांना मिळाले होते. याच खून प्रकरणी पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्य्रातील, कौसा भागातील शिवाजीनगर येथून महंमद अब्दुल्ला तजमुल शेख उर्फ बिरेंद्र सहा (५०, मुुळ रा. बिहार) याला सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांच्या पथकाने १६ जानेवारी रोजी अटक केली. तेंव्हा तो मुलीवरच लैंगिक अत्याचर करीत असल्याची बाब त्याच्या पत्नीकडून उघड झाली. पोलिसांनी त्याला मुलीच्या बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला आधी १८ जानेवारी त्यानंतर २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सोमवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्या. संगिता खलिफे यांनी त्याल २ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या खून प्रकरणी त्याला पुन्हा ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली असता, ही विनंती मान्य करण्यात आली. परंतू, कायदेशीर बाबींसाठी त्याचा ताबा मंगळवारी देण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्याला आता २२ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने केलेल्या चौथ्या पत्नीच्या खून प्रकरणी लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.