शुभेच्छांच्या बॅनरबाजीने मुंब्य्रात आचारसंहितेचा भंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:22 AM2018-06-18T03:22:24+5:302018-06-18T03:22:24+5:30
नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली मुंब्य्रात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करण्यात येत असल्याचे जागरुक नागरिकांचे मत आहे.
- कुमार बडदे
मुंब्रा : नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली मुंब्य्रात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करण्यात येत असल्याचे जागरुक नागरिकांचे मत आहे.
२५ जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. यासाठी ठाणे महापालिका हद्दीतील विभागांमध्ये आचारसंहिता सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समितीअंतर्गत लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे, नेत्यांचे पोस्टर, बॅनर काढून टाकण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानंतर, प्रभाग समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी ते त्वरित काढलेही होते. मात्र, त्यानंतर पुन्हा मागील तीन दिवसांपासून मुंब्रा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ च्या दुतर्फा ईदच्या शुभेच्छा देण्याच्या नावाखाली काही राजकीय पक्षांचे पक्षप्रमुख, लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी यांचे फोटो असलेल्या शेकडो होर्डिंग्ज पुन्हा दिमाखात झळकत आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची प्रतिक्रि या जागरूक नागरिक करत आहेत.
>मुंब्य्रातील रस्त्यावर लावण्यात आलेले शुभेच्छांचे होर्डिंग्ज, बॅनर सोमवारी काढण्यात येतील.
-झुंजार परदेशी, सहायक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती