मुंबईच्या नेटिझन्स्चा पुण्यावर मारा

By Admin | Published: May 23, 2017 01:47 AM2017-05-23T01:47:35+5:302017-05-23T01:47:35+5:30

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटस्चा अवघ्या एका धावाने पराभव करत रोमांचकारी विजय मिळविला

Mumbai's Netizens hit Pune | मुंबईच्या नेटिझन्स्चा पुण्यावर मारा

मुंबईच्या नेटिझन्स्चा पुण्यावर मारा

googlenewsNext

स्नेहा पावसकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटस्चा अवघ्या एका धावाने पराभव करत रोमांचकारी विजय मिळविला आणि क्षणार्धात नेटिझन्सनी सोशल मीडियावरून पुणे आणि पुणेरीपणावर विडंबनात्मक, विनोदी मेसेज पोस्ट करून धम्माल उडवली. त्यातील काही निवडक -
आता हे काय, मुंबईने पुण्याला फायनलपर्यंत पोहोचवलं आणि नंतर उल्लू बनवलं...,
वडापाव भारी, मिसळपाव घरी
पुणेकरंना दोनच गोष्टी माहित आहेत एमएच बारा आणि फायनलला हारा
पुणे तर फक्त मिरवणुकीसाठीच फेमस् आहे, खर विसर्जन तर मुंबईच करते, पुन्हा एकदा सिद्ध
पुण्याला १ बॉलमध्ये चार धावा होऊ शकल्या नाहीत. १ ते ४ दुपारी झोपायची सवय, दुसरे काय...
मुंबई हरली तर पुण्याच जिओ बंद- अंबानी बंधू
पुणे हरली तर मुंबईकरांना बाकरवडी बंद - चितळे बंधू
पाण्यात गेल्यावर मगरीशी, जंगलात गेल्यावर वाघाशी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी कधीच भिडू नका कारण जिओचा टॉवर आणि मुंबईची पॉवर फुलच मिळणार
टोमणे मारणं आणि फायनल जिंकण यात फरक आहे, हे कोण समजवेल पुणेकरांना
तुमने हमको इतना मारा, हमने सिर्फ एकही मारा लेकीन सॉलिड मारा...
असे मुंबईच्या समर्थनार्थ अनेक मनोरंजक मेसेजेस् झपटप पोस्ट आणि लाईक होत होत.
दुसरीकडे पुणे हरल्यावरही पुणेरीपणा दाखविणारे मेसेजेस्ही वाचायला मिळाले.
पुणेकरांचा फोनवरील संवाद- ‘दोन्ही टीमने हरण्याचे प्रयत्न केले,त्यात पुण्याचा विजय झाला’.
असले कप आमच्यात चहा प्यायला वापरतात - एक पुणेकर


आजीबाई झाल्या फेमस
या मॅचदरम्यान स्टेडियममध्ये असूनही मॅच न पाहता उलट हात जोडून देवाचा धावा करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या फॅन असलेल्या आजीबार्इंवर सतत कॅमेरा फिरवला जात होता. आणि मुंबईने मॅच जिंकल्यावर याच आजीबाईंचा फोटो सोशल मिडीयावर फिरायला लागला. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर मेसेजेस्ही तयार झाले आणि झटपट शेअरही. ते पुढीलप्रमाणे....
इतर कोणामुळे नाही, या आजीमुळे मुंबई जिंकली...
बाकी सगळं जाऊ दे, त्या आजी कुठल्या देवाला पाया पडल्या असेल रे...

Web Title: Mumbai's Netizens hit Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.