मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या; ४८ तासातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 19:01 IST2023-06-28T19:01:30+5:302023-06-28T19:01:42+5:30
सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या; ४८ तासातील दुसरी घटना
मुंब्रा : येथील बाह्यवळण(बायपास) रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या.या रस्त्यावर मागील ४८ तासां दरम्यान दुस-यांदा दरड कोसळल्याची घटना घडल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,त्यांच्या मनामध्ये भिती पसरली आहे. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्या जवळील खडी मशीन रोड जवळील डोगरा वरील माती ठिसूळ झाल्यने बुधवारी दुपारी काही दरडी माती आणि झाडांसह ठाण्याच्या दिशेने जणाऱ्या मार्गिकेच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला कोसळल्या. ही घटना घडली तेव्हा तेथे कुणीही नव्हते.
यामुळे सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान तसेच मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती व्यावस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून दरड हटवली.या घटनेची माहिती संबधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती ठामपाच्या आप्तकालिन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.