राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंब्रा बायपासवर जाळपोळ, आव्हाडांविरोधातील विनयभंगाच्या गुन्ह्याविरोधात निदर्शनं
By कुमार बडदे | Published: November 14, 2022 10:42 AM2022-11-14T10:42:35+5:302022-11-14T10:42:52+5:30
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
मुंब्राः
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आव्हाड यांच्या या ट्विटचे पडसाद त्यांचा मतदार संघ असलेल्या मुंब्र्यात लगेच उमटले असून संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी मुंब्रा बायपासवर सकाळीच जाळपोळ केली आहे. सकाळीच हा प्रकार झाल्याने बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान आता बायपास वाहतुकिसाठी खुला करण्यात आला आहे.
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा; नेमकं घडलं काय? वाचा...
आव्हाड यांच्या विरोधात ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. ट्वीटद्वारे त्यांनी तशी घोषणा केली आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"