Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "मला या गोष्टीचं दुःख झालंय की..."; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:47 PM2024-11-23T20:47:24+5:302024-11-23T20:48:15+5:30
कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे जवळपास एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
Mumbra-Kalwa Vidhan Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. जवळपास एक लाखांच्या मताधिक्क्याने आव्हाड हे विजयी झाले. आव्हाड यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मला एका गोष्टीचं दुःख झाल्याचे म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दिग्गज नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विश्वास दाखवला होता. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांचा दारुण पराभव केला. नजीब मुल्ला हे माजी नगरसेवक असून त्यांनी आव्हाड यांना आव्हान दिलं होतं. या निकालनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही हे दु:खद आहे. आम्ही पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू. आम्ही ईव्हीएमवर विश्वास ठेवू शकत नाही. अनेक मोठे नेते (महाविकास आघाडीचे) निवडणुकीत पराभूत झाले याचे मला दुःख आहे," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Thane: On #MaharashtraElectionResult NCP-SCP leader Jitendra Awhad says, "It is sad that we could not perform well. We will introspect on the reasons for the defeat...we should not trust EVMs. I am sad that many big leaders(of Maha Vikas Aghadi) lost the elections" pic.twitter.com/WC8pXX7RKI
— ANI (@ANI) November 23, 2024
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत होते. तर ठाणे जिल्ह्यातील नजीब मुल्ला, आनंद परांजपे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत नजीब मुल्ला यांचा एक लाख मतांनी पराभव झाला आहे. सलग चौथ्यांदा जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदारसंघातून निवडून आले आहेत.