मुंब्रा - दिवा खाडीतील अवैध रेती उत्खननवर धडक कारवाई; १६ सक्शनपंपसह बार्ज तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:24 PM2020-01-13T18:24:39+5:302020-01-13T18:29:50+5:30

या धडक कारवाई दरम्यान रेती उत्खनन करणारे नेहमीप्रमाणचे पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र खाडीत असलेले सक्शन पंप व बार्ज आदी बोटी कोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटी या करवाईतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांनी सांगितले. या बार्जमध्ये व सक्शनपंपात रेती नसल्याचेही पाटील यांनी निदर्शनात आणून दिले. पण या खाडी किनारी असलेल्या रेती साठवण्याच्या १० ते १५ कुंड्या तोडून जमिनदोस्त केल्याचे पाटील यांनी निदर्शनात आणून दिले.

Mumbra - Shocking action on illegal sand mining in Diva Bay; बा Break barge with suction pump | मुंब्रा - दिवा खाडीतील अवैध रेती उत्खननवर धडक कारवाई; १६ सक्शनपंपसह बार्ज तोडल्या

सोमवारी या खाडीत धडक कारवाई करून को्यावधी रूपये किंमतीचे आठ सक्शनपंप व आठ बार्ज जेसीबीच्या सहाय्याने तोडल्या

Next
ठळक मुद्देकोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटीवर करवाईरेती साठवण्याच्या १० ते १५ कुंड्या तोडून जमिनदोस्त ४५ जणांच्या पथकांसह पोलिसांचा सहभाग

ठाणे : येथील कळवा, मुंब्रा, दिवा खाडीत रेतीमाफियांनी बिनदिक्कत अवैधरेती उत्खनन करून कांदळवन व खारफूटी नष्ठ केली आहे. या मनमानीला सातत्याने निदर्शनात आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी या खाडीत धडक कारवाई करून को्यावधी रूपये किंमतीचे आठ सक्शनपंप व आठ बार्ज जेसीबीच्या सहाय्याने तोडल्या आहेत.
         या धडक कारवाई दरम्यान रेती उत्खनन करणारे नेहमीप्रमाणचे पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र खाडीत असलेले सक्शन पंप व बार्ज आदी बोटी कोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटी या करवाईतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांनी सांगितले. या बार्जमध्ये व सक्शनपंपात रेती नसल्याचेही पाटील यांनी निदर्शनात आणून दिले. पण या खाडी किनारी असलेल्या रेती साठवण्याच्या १० ते १५ कुंड्या तोडून जमिनदोस्त केल्याचे पाटील यांनी निदर्शनात आणून दिले. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, दिवा, कळवा खाडीत अवैध रेती उत्खनन बिनदिक्कत होत होती. त्यावर लक्ष केंद्रीत करून जिल्हा प्रशासनाने ही धडक कारवाई सोमवारी केल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
        खाडीत उभ्या असलेले सक्शनपंप व बार्ज या कारवाई पथकाच्या निदर्शनात आले. त्यांना कसेबसे खाडी किनारी आणून तोडण्यात आले. या दरम्यान उत्खनन करणारे कोणीही घटनास्थळी सापडले नाही. पथक खाडी किनारी जाण्यापूर्वी घटना स्थळावरील रेतीमाफियांनी पोबारा केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईनुसार प्रशासनाकडून निनावी गुन्हह्याची नोंद केली जाणार आहे. या कारवाईसाठी खाडी किनाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचे तीन तहसीलदारांसह भार्इंदर अपर तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल आदीं ४५ जणांच्या पथकांसह पोलिसांचा सहभाग होता. या मनुष्यबळाच्या ताकदीवर या रेती माफियांचे सक्शनपंप व बार्ज तोडण्यात यश मिळाल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले.
.

 

Web Title: Mumbra - Shocking action on illegal sand mining in Diva Bay; बा Break barge with suction pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.