सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा 

By अजित मांडके | Published: June 8, 2023 06:46 PM2023-06-08T18:46:32+5:302023-06-08T18:46:49+5:30

गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.

Mumbra shutdown on July 1 if truth not brought out Jitendra Awad's warning | सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा 

सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा 

googlenewsNext

ठाणे: गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोटÎा बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल, असा  इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.  

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या धार्मिक विद्वेषातून शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा तर मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहेच; शिवाय, हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव आहे. 

हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? आपण गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱयाला जाहीर आव्हान देत आहोत की त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱया मुलांचे नाव-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावित. जर, खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करीत होते?  हा प्रकार म्हणजे एका शहराला बदनाम करुन त्याची अर्थव्यवस्था धुळीस मिळविण्याचा प्रयत्न आहे. आज मुंब्रा, कौसा, शिळ या भागात 5 कोटी चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. या घरांची विक्री मोठÎा प्रमाणात होत असतानाच अशा खोट्या बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उद ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

धर्मांतराची ही बातमी खोटी आहेच; पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे. महाराष्टाची निवडणूक जिंकायची आहे म्हणून काय पातळीवरचे राजकारण केले जात आहे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे. मग, जितेंद्र आव्हाड तिथे आहेत. मग, आपल्यावर तलवार चालवायची. माझ्या एकट्यासाठी  काय काय करणार आहात? आता संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरे बंद झाली आहेत. ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले होते; त्यांनी त्यावेळी धर्मांतरे केली होती. कारण स्वत;च्या धर्मात सन्मान नसल्यानेच अनेकांनी धर्मांतरे केली होती. पण, आता धर्मांतरे बंद झाली आहेत. संविधान आल्यामुळे ते अस्पृश्य लोक माणूस म्हणून जगू शकले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आता तुम्ही या संविधानावरच तलवार चालवित आहात. हिंदू धर्माचा अपान करणारे हे कोण आहेत? 400 मुलांनी धर्मांतर केल्याचा काय पुरावा आहे?  ही चारशे मुले दाखवा; आपण राजीनामा द्यायला तयार आहोत. 
 
हे सर्व शिजवलेले नाटक आहे. महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव समोर दिसत आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून असा फुसका बार सोडण्यात येत आहे. तसेच, कोणाकडून तरी दंगल घडवायची, असे प्रकार सुरु आहेत. आपण चार महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, महाराष्ट्रामध्ये दंगल घडविली जाणार. त्याची पार्श्वभूमी ही राजकीय असेल. भाजपचे राजा नामक नेते येऊन केले. त्यांनी नागरिकांना भडकावले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, जो कोणी धर्मद्वेष पसरविणारे भाषण करेल. त्याच्या विरोधात तक्रार आली नाही तरी पोलिसांनी त्या भाषणावर त्वरीत गुन्हा दाखल करावा. ठाणे पोलिसांनी आजवर का गुन्हा दाखल केला नाही.  हा गुन्हा दाखल न करणाऱया पोलिसांना निल़ंबित करणार का?  काय चालविले आहे? तुमच्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही महाराष्ट्रात जाळून टाकाल. हा वणवा आहे. त्यामध्ये सर्वच जळून खाक होतील. आपले स्पष्ट म्हणणे आहे की, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी महाराष्ट्राला सांगावे की गाझीयाबादमधून पोलीस अधिकाऱयाने जे सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे? अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करुन हिंदू-मुस्लीम यांचा एकत्रित मोर्चा काढू.

 आमचे शहर असे बदनाम होऊ देणार नाही. या शहाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून येथे सर्व धर्मिय लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा शहराला बदनाम करणे योग्य नाही. आपण मुंब्रा शहराचे प्रतिनिधीत्व करीत असल्यानेच मी हा जाब विचारत आहे. अन् मी संविधानावर हात ठेवून धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे ज्या शहरात असे धर्मांतर घडलेच नाही. त्याची बदनामी करणाऱयाला भरपाई करावीच लागेल. या प्रकरणात सरकारला उत्तर द्यावेच लागेल. ज्या पद्धतीने केरळ स्टोरीमध्ये 32 हजार मुलींची खोटी कथा सांगण्यात आली. तसाच हा प्रकार आहे, असेही डॉ. आव्हाड म्हणाले.  

भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा कट 
दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना मारण्याचा कट रचला आला होता, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अमोल केंद्रे आणि रोहिदास मुंडे यांना मारण्यासाठी कट रचण्यात आला होता. सुदैवाने ते त्यांच्या हाती लागले नाहीत म्हणून बचावले. भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कट रचले जात असतील तर काय होणार या शहराचे? , असा सवाल डॉ. आव्हाड यांनी केला.
 

Web Title: Mumbra shutdown on July 1 if truth not brought out Jitendra Awad's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.