तलाक टाळण्यासाठी मुंब्य्रात समुपदेशन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:17 AM2018-04-30T03:17:15+5:302018-04-30T03:17:15+5:30

बदललेली मानसिकता, सामाजिक राहणीमान, सातत्याने घसरत चाललेली कथित वैचारिक पातळी यामुळे क्षुल्लक कारणांमुळे तलाक (घटस्फोट) चे प्रमाण वाढले आहे

Mumbra Tragedy Camp to Avoid Divorce | तलाक टाळण्यासाठी मुंब्य्रात समुपदेशन शिबिर

तलाक टाळण्यासाठी मुंब्य्रात समुपदेशन शिबिर

Next

कुमार बडदे
मुंब्रा : बदललेली मानसिकता, सामाजिक राहणीमान, सातत्याने घसरत चाललेली कथित वैचारिक पातळी यामुळे क्षुल्लक कारणांमुळे तलाक (घटस्फोट) चे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी विवाहेच्छुकांसाठी तसेच वर्षभरापूर्वी ज्यांचे विवाह झाले आहेत, अशा नवविवाहितांसाठी जमाते इस्लामी-ए-हिंदच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी समुपदेशन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ रविवारी (६ मे) मुंब्य्रातून होणार आहे.
खडी मशीन रोडजवळील एका खाजगी सभागृहात रविवारी सकाळी १० ते दुपारी दीड वाजतादरम्यान होणाऱ्या या शिबिरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तलाकच्या वाढत्या प्रमाणामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर व त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. तलाकसाठी जे मुद्दे पुढे येत आहेत, ते अगदीच नगन्य असून चर्चेअंती त्यावर तोडगे निघू शकतात; परंतु याबाबत मनात निर्माण होत असलेल्या अढीमुळे तसेच समोरील व्यक्तीचे ऐकूनच घ्यायचे नाही, या मानसिकतेमुळे अनेकदा क्षुल्लक विषयदेखील तलाकपर्यंत पोहोचतात, असे हिंदच्या लक्षात आले.

Web Title: Mumbra Tragedy Camp to Avoid Divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.