मुंब्य्राचा बेशिस्तीचा कलंक कधी पुसला जाणार?, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:52 AM2017-11-20T02:52:53+5:302017-11-20T02:52:57+5:30

मुंब्रा- डोंगरमाथ्यावर असलेल्या मुंब्रादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मुंब्रा शहर खºया अर्थाने खाडीकिनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे.

Mumbra's shamelessness will never be erased, people's representatives and municipal corporation are neglected | मुंब्य्राचा बेशिस्तीचा कलंक कधी पुसला जाणार?, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून होतेय दुर्लक्ष

मुंब्य्राचा बेशिस्तीचा कलंक कधी पुसला जाणार?, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून होतेय दुर्लक्ष

Next

- पंकज रोडेकर, कुमार बडदे,
मुंब्रा- डोंगरमाथ्यावर असलेल्या मुंब्रादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मुंब्रा शहर खºया अर्थाने खाडीकिनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. सुमारे आठ ते नऊ लाखांच्या घरात लोकसंख्या पोहोचली आहे. बहुसंख्य मुस्लिम आणि कमी प्रमाणात असलेली हिंदूंची लोकवस्ती. तरीसुद्धा, ही मंडळी कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने मुंब्य्रात वास्तव्यास आहे.
नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा या शहरालाही आहेत. एका बाजूला शांततेत जीवन जगणारे दोन्ही जातींचे नागरिक, तर दहशतवादी कारवायांमधील काही आरोपी हे मुंब्रा परिसरात पकडले गेल्याने मुंब्रा बदनाम झाले. गुन्हेगारीचा कलंकच लागला. म्हणजे, एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यावर समजायचे की, ही व्यक्ती आपल्या शेजारी राहायची. दिवसेंदिवस वाढत्या नागरिकीकरणामुळे तेथील मूलभूत सुविधाही तोकड्या पडू लागल्या आहेत. त्यातच, स्थानिक लोकप्रतिनिधीही छोट्याछोट्या गोष्टींसाठी राजकारण करतात. याचा फटका सामान्यांना बसतो. दुसरीकडे या सुविधा देण्यात महापालिका प्रशासनाकडूनही काही प्रमाणात दुर्लक्षच झाले आहे.
मुंब्रा म्हटले की, वारंवार प्रखरतेने दिसणारी अस्वच्छता असो, दुर्गंधी असो, वाहतूककोंडी असो, फेरीवाल्यांचा प्रश्न असो, वीजबिल (देयक) असो, इतर नागरी सुविधा असो... या वाढत नसल्या तरी त्या कमी होतानाही दिसत नसल्याने मुंब्रा म्हणजे बेशिस्त, असा शिक्का या शहरावर बसला आहे. ठाणे महापालिकेचा इतिहास पाहिल्यास मुंब्य्राला एक वेळ महापौरपदाची संधी चालून आली होती. त्यानंतरद्व बºयाच वेळा विरोधी पक्षनेतेपद, सभागृहनेतेपदही मुंब्रा शहराच्या वाट्याला आले. परंतु, त्यांच्या माध्यमातून जो काही विकास झाला, तो आता इतिहासजमा झाला, असेच म्हणावे लागेल. कारण, आज शहराची परिस्थिती पाहता विकास कुठे झालेला दिसत नाही. जरी शहरात सुविधांचा अभाव असला, तरी नागरिकीकरण होत आहे. नागरिकही येथे राहण्यासाठी येत आहेत. यामुळे महापालिकेवर मुंब्य्रातून सध्या २३ नगरसेवक निवडून गेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ नगरसेवक आहेत. सत्ताधाºयांचा एकही नगरसेवक नसल्याने येथे विकासाची गंगा आणण्यासाठी विरोधकांना दोन हात करण्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर बेशिस्त छाप पुसण्यासाठी प्रशासन वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवते. परंतु, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. मागील काही वर्षांपासून मुंब्रा शहर वेगवेगळ्या वास्तूंमुळे आपली नवी ओळख निर्माण करत आहे.
यासाठी मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या आवारातच शहीद स्मारक करण्यात आले असून तेथे रणगाडा, एम वास्तू तर कौसा भागातील अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडिअम
यांची भर पडली आहे. शहीद स्मारक आणि एम आकारात उभारलेल्या वास्तूला सध्या बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
>सुविधांची वानवा दूर होणार तरी कधी?
ठाणे महापालिकेत असूनही सत्ताधाºयांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मुब्रा कायमच बकाल होत गेले. देशभर ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला जात असला तरी तो या शहरात पालिकेने पोचू दिलेला नाही. अपुरे पाणी, सतत होणारा विजेचा खेळखंडोबा, आरोग्य-शिक्षणाच्या सुविधांची वानवा यामुळे मुंब्रावासीयांचा सतत कोंडमारा होतो. तो दूर करणार कधी हा प्रश्न आहे.
मुंब्य्रात ज्या काही सुविधा मिळतात, त्या महापालिकेच्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या सुविधांपासून मुंब्य्रावर नेहमीच अन्याय झाला आहे. स्थानिक आमदार महापालिकेच्या माध्यमातून होणाºया कामांवर श्रेय लाटत आहेत. मुंब्य्रात अस्वच्छता आहे. पाणी मुबलक असले तरी, त्याच्या वितरणावर नियंत्रण नाही. एकाच केंद्रावर मुंब्य्रातील आरोग्यव्यवस्था अवलंबून आहे.
त्यातच, आणखी पालिकेच्या माध्यमातून रुग्णालय होणार आहे. मात्र, त्याच्या खासगीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याने गरिबांना त्याचा उपयोग होणार नाही. मराठी शाळांची अवस्था बिकट असून तेथे बसण्यापासून स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. बायपास हा रस्ता तर ‘मौत का कुआ’ झाला आहे. अमृतनगर हे कोंडीचे ठिकाण आहे. तसेच मुंब्य्रातून नवीन पर्याय मार्ग होत आहे. त्यामुळे मुंब्य्रात आणखी कोंडी होईल, अशी भीती आहे. - सुधीर भगत, माजी नगरसेवक
>प्रथम दर्शन होते अस्वच्छतेचे
रेल्वेस्थानकातून मुंब्रा शहरात बाहेर पडल्यावर प्रथम दर्शन होते ते अस्वच्छतेचे. या दोन्ही वास्तूंना गर्दुल्ले आणि भिकाºयांनी वेढले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा होणारा कानाडोळा याला कारणीभूत आहे.

Web Title: Mumbra's shamelessness will never be erased, people's representatives and municipal corporation are neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.