सरपंचाला मुंडे यांचा दिलासा!

By admin | Published: May 28, 2017 03:11 AM2017-05-28T03:11:18+5:302017-05-28T03:11:18+5:30

तालुक्यातील नढई गावच्या सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी मृत व्यक्तीस निवासाचा दाखला देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांनी

Munde's sarpanchala relief! | सरपंचाला मुंडे यांचा दिलासा!

सरपंचाला मुंडे यांचा दिलासा!

Next

- प्रकाश जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क

मुरबाड : तालुक्यातील नढई गावच्या सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी मृत व्यक्तीस निवासाचा दाखला देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांनी त्यांना दोषी धरून तत्काळ पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांविरुद्ध टोहके यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अपील केले होते. मुंडे यांनी टोहके यांची बाजू ग्राह्य मानून त्यांना दोषमुक्त केले आहे.
नढईच्या सरपंच टोहके यांनी टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी गौरूबाई केंबारी या मृत महिलेच्या नावाने निवासाचा दाखला दिला होता. गौरूबाई यांचे माहेर नढईचे होते. त्या आपल्या पतीच्या आत्या असल्याचे भासवून हा दाखला देताना दाखल्यावर आपले दीर शिवाजी गोविंद टोहके यांच्या सासूबाई गं.भा.भागीरथीबाई पदू दिनकर (रा.दहिपाडा-सरळगाव) या जिवंत महिलेचा फोटो लावला होता. हा दाखला मुरबाड येथील दुय्यम निबंधक यांच्याकडे ७ आॅक्टोबर २०१३ रोजी हक्कसोड नोंदणीकरिता आला असता नढई गावातील भाऊ बुधाजी टोहके व संतोष नामदेव टोहके या ग्रामस्थांनी त्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्र ार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंच पद्मा टोहके यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. चौकशीत गौरूबाई केंबारी यांचे १८ मे २०१३ रोजी निधन झाले असून मृत्यूसमयी टेंभरे (बुद्रुक)असा कायमचा पत्ता असल्याचा दाखला ग्रामसेवक टेंभरे यांच्याकडून सादर करण्यात आला. तसेच ज्या जिवंत महिलेचा सरपंच टोहके यांनी दाखल्यावर फोटो लावला होता, ती व्यक्ती ही गौरूबाई केंबारी असल्याचेच दाखवण्याकरिता आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँकपासबुक, घरपट्टी किंवा मतदारयादीतील नाव व पत्ता असा कोणताही पुरावा सोबत जोडला नव्हता. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावे हक्कसोड दस्तऐवज बनवण्याचा खोटा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र ग्रामपंचायत कलम ३९ (१) नुसार कोकण विभागीय आयुक्तांनी टोहके यांना सरपंचपदावरून दूर करण्याचे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते.

अन्याय दूर झाला...
- सरपंच टोहके यांनी दिलेल्या दाखल्यात काही गैर नाही, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
- हा सर्व प्रकार केवळ मला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. मात्र, मला अखेर न्याय मिळाला, असे मत नढईचे सरपंच पद्मा टोहके व्यक्त केले.

Web Title: Munde's sarpanchala relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.