१४ अनाधिकृत होर्डींगवर पालिकेची कारवाई
By अजित मांडके | Published: June 5, 2024 05:40 PM2024-06-05T17:40:42+5:302024-06-05T17:41:06+5:30
ठाणे : मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने आता शहरातील तब्बल १४ ...
ठाणे : मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने आता शहरातील तब्बल १४ होर्डींगवर कारवाई केली आहे. तर ३२ ओव्हरसाईज होर्डींगचे आकार कमी करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या जाहीरात विभागाने दिली. तर २६० होर्डींगजचे स्ट्रक्चरल अहवाल सादर झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला या होर्डींगजवर कारवाई करण्याची जाग आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत ठाण्याच्या वेशीपासून ते अगदी थेट घोडबंदरच्या शेवटच्या टोकापर्यंत होर्डींगजे जाळे पसरले आहे. परंतु त्यावर कारवाई मात्र होतांना दिसत नव्हती. शहरात आजही ९० च्या आसपास ओव्हरसाईज होर्डींग आहेत. मात्र त्याकडे पुन्हा एकदा काना डोळा करण्यात आल्याचेच चित्र आहे. असे असले तरी महापालिकेने आता ओव्हरसाईज असलेल्या ३२ होर्डींगवर कारवाई केली आहे. त्यांचे आकार कमी करण्यात आले आहेत. तसेच २९४ होर्डींगजे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेश संबधीत जाहीरातदारांना दिले होते. त्यानुसार २६० होर्डींगजचे स्ट्रक्चरल आॅडीटचे अहवाल सादर झालेले आहेत. त्यात कोणताही दोष आढळून आलेला नसल्याचेही पालिकेचे म्हणने आहे. परंतु त्याचे त्रयस्त तपासणी मात्र महापालिकेकडून होणार नसल्याचेच दिसत आहे.
दुसरीकडे महापालिकेने शहरात प्रभाग समितीनिहाय सर्व्हे करुन १४ अनाधिकृत होर्डींगवर कारवाई केली आहे. यापुढेही अशी कारवाई होत राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.